व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट, चॉकलेट्स आणि रोमॅंटिक संगीताचीसोबत असेल हा व्हॅलेंटाईन अगदी खास बनतो. मातृभाषेत भावना व्यक्त करणं अगदी सोपं जातं कि काय म्हणूनच मराठी गीतं कोणत्याही संगीत प्रकारापेक्षा आपली वाटतात. त्यामुळेच या सदाबहार मराठी गीतांचा नजराणा पीपिंगमूनने तुमच्यासाठी आणला आहे.
मला वेड लागले प्रेमाचे : मराठी सिनेमातील प्रेमाची व्याख्या बदलणारा सिनेमा म्हणजे टाईमपास. या सिनेमातील ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्याने प्रत्येकालाच वेड लावलं आहे. या गाण्यातील दगडू आणि प्राजक्ताची लव्हस्टोरीही तितकीच भावते.
याड लागलं : मला वेड लागले प्रेमाचे या गाण्याचं ग्रामीण व्हर्जन वाटावं इतकी जादू सैराट सिनेमातील या गाण्याने रसिकांवर केली आहे. अजय अतुल जोडीचं श्रवणीय संगीत आणि आर्ची आणि परशाची केमिस्ट्री या गाण्याला खास बनवते.
टिक टिक वाजते डोक्यात: ८०च्या दशकातील प्लॅटोनिक प्रेमाची अनुभूती करून देणारा तसेच यारी दोस्तीमधील प्रेम दाखवणारा सिनेमा म्हणजे दुनियादारी या सिनेमातील टिक टिक वाजते डोक्यात या गाण्याला रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. मैत्री आणि प्रेमाचे अलवार बंध उलगडणारं हे गाणं आजही अनेकांचं हॉट फेव्हरिट आहे.
ओल्या सांजवेळी : ‘प्रेमाची गोष्ट’ या सिनेमातील हे गाणं हलकं फुलकं आणि तितकंच रोमॅंटिक आहे. अतुल आणि सागरिका यांच्या व्यक्तिरेखांमध्ये चाललेली उलाघाल या गाण्यात खुप सुंदर दिसली आहे. काहीशा हटके बाजाचं हे गाणं तुमची रोमॅंटिक संध्याकाळ अधिकच गहिरी करेल यात शंका नाही.
अधीर मन झाले : ‘निळकंठ मास्तर’ या सिनेमातील या श्रवणीय गाण्याने अनेकांना वेड लावलं. पुजा सावंतवर चित्रित झालेलं हे गाणं अत्यंत सुरेल आहे. रोमॅंटिक लॉन्ग ड्राईव्हवर जाताना दे गाणं तुमचा मूड चांगला करेल यात शंका नाही.