नाना पाटेकर आणि सक्षम कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला 'पकपक पकाक' हा मराठी सिनेमा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भावला. आजसुध्दा 2005 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.
या सिनेमात चिखलूला समजून घेणारी त्याला साथ देणारी त्याची मैत्रिण शालू तुम्हाला नक्कीच आठवत असेल. पण हीच शालू आता नेमकी कशी दिसते आणि काय करते तुम्हाला जाणून उत्सुकता असेलच.
साळू फेम नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते.ती मूळची पुण्याची आहे.
“क्युंकी सांस भी कभी बहू थी” या लोकप्रिय मालिकेत केसरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तिची ही भूमिका खूप गाजली. या मालिकेतील लक्षवेधी भूमिकेमुळे नारायणीला हिंदी मालिकांच्या अनेक ऑफर्स मिळू लागल्या.
कुसुम, पिया का घर, लाल ईश्क अशा अनेक टीव्ही मालिकेतून नारायणी झळकली. हिंदी मालिकेत काम करत असली तरी मराठी ही भाषाही तिला चांगलीच अवगत आहे. पक पक पकाक नंतर ऋण या आणखी एका मराठी सिनेमात तिने प्रमुख भूमिका साकारली.
तसंच घात, चांदणी बार, मुंबई मेरी जान, न घर के ना घाट के या बॉलिवूड चित्रपटात देखील तिने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
२०१५ साली नारायणीने परदेशी बॉयफ्रेंड असलेल्या ‘स्टीवन ग्रेवर’ सोबत गुपचूप लग्नगाठ बांधली.
हे कपल मुंबईतच स्थायिक असून नारायणी सध्या हिंदी मालिकांमध्येच रमल्याचं पाहायला मिळतंय.