By  
on  

सरणावरची आग अजूनही विझली नाही मुले पौरकी शाहीदांची निजली नाही:जितेंद्र जोशी

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या 42 जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी याने सोशल मिडीयावर एक हदयद्रावक कविता पोस्ट केली आहे.

सरणावरची आग अजूनही विझली नाही
मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही
निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी
मने कोरडी रक्तानेही भिजली नाही

आग लागली अवतीभवती
मनात पण ठीणगीहि नाही
अब्रू स्वाभिमान चिरडला
कितीक किड्यांसम फुटले
ती गणतीही नाही
सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही
मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही

धर्म जाहला शाप
पसरले पाप
उरी अंधार दाटला
गिळून घेईल साप
लागुनी धाप
कोवळा जीव फाटला
अणु रेणूंचा स्फोट होऊनी
जळतो आम्ही
देवा(?) आता मनात आशा उरली नाही

निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी
मने कोरडी रकतानेही भिजली नाही

-जितेंद्र जोशी

 

https://www.facebook.com/jitendra.joshi.359/posts/10205818723544410

 

या ओळी जितेंद्र जोशी यांच्या कवितेतील आहेत. त्यांच्या कवितेतून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive