दिग्दर्शक: समीर विद्वांस
कलाकार : ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, अंकिता गोस्वामी, क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, गीतांजली कुलकर्णी
वेळ: २ तास १५ मिनिट
रेटींग : 3.5 मून
सिनेसृष्टीतील बायोपिकच्या लाटेत आणखी एक सिनेमा म्हणजे आनंदी गोपाळ. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. या सिनेमातून केवळ त्यांचा प्रवास सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही तर एकप्रकारे त्यांच्या कार्याला केलेला सलाम आहे. कर्मठ समाजाची पाळंमुळं दूर करणा-या आनंदीबाईंची गोष्ट प्रत्येकाला प्रेरणा देईल अशी आहे.
कथानक
त्यावेळेच्या समाजरितीप्रमाणे दहा वर्षांच्या आनंदीचं (भाग्यश्री मिलिंद) लग्न गोपाळरावांशी (ललित प्रभाकर) होतं. गोपाळरावांचा स्वभाव काहीसा तऱ्हेवाईक, रोखठोक असतो. लग्नाची बोलणी सुरु असतानाच आनंदीबाईना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट गोपाळराव आनंदीबाई यांच्या वडिलांना घालतात. लग्नानंतर गोपाळरावांच्या धाकने आनंदीबाईंचं शिक्षण सुरु होतं. एकीकडे नव-याचा शिक्षणासाठी जाच तर दुसरी समाज आणि इतर कुटुंबियांकडून होणारी कुचंबणा यात आनंदीबाईंचं जीवन अधिक कष्टप्रद होत जातं. पण गोपाळ रावांचा हट्ट कायम असतो. त्यातूनच आनंदीबाईंना स्त्रियांना पुरुष डॉक्टरांकडे जाताना होणारी कुचंबणा दिसते. त्या मेडिकलला जाण्याचा निर्णय घेतात. गोपाळरावांच्या स्वप्नाला निर्धाराच्या कोंदणात बसवून आनंदीबाई भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनतात.
अभिनय
ललित आणि भाग्यश्रीने त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत. त्याकाळच्या वातावरणाचा फील करून देण्यास दिग्दर्शक समीर विद्वांस यशस्वी झाला आहे. सिनेमाचं पार्श्वसंगीत आणि गरजेनुसार यात गाणी घातली आहेत. याकाळात समाजाच्या दृष्टीने वैद्य सर्वोत्तम, डॉक्टरकडे जाणं हे पाप मानलं जायचं. अशा काळात आनंदीबाईंच्या मनात वैद्यकीय शिक्षणाबद्दलची ऊर्जा निर्माण होते. यांत आनंदीबाईंच्या दृढनिश्चयाला साथ गोपाळराव साथ देतात.
सिनेमा का पहावा
त्याकाळातील समाजव्यवस्थेचा अनुभव घेण्यासाठी आणि आनंदीबाईंचा संघर्ष पडद्याववर पहायचा असेल हा सिनेमा पडद्यावर पहावा. एकोणिसाव्या शतकातील सामाजिक-सांस्कृतिक चित्र अत्यंत नेमकं उतरलं आहे. कलाकारांचं दमदार अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरते.
https://www.youtube.com/watch?v=mAS_hUTOJdY&t=1s