By  
on  

केतकी माटेगावकरने सुशांत सिंग राजपुतला वाहिली स्वरश्रद्धांजली, पाहा व्हिडियो

अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर सोशल मिडियावर भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे स्टायलिश फोटोही चाहत्यांशी शेअर करत असते.तसंच काही आठवणीसुध्दा शेअर करते. आता मात्र केतकीने एक खास व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 

केतकीने अभिनेता सुशांत सिंग राजपुतला स्वर श्रद्धांजली वाहिली आहे. केतकीने सुशांतच्या ‘छिछोरे’ सिनेमातील ‘खैरियत’ गाणं गायलं आहे. केतकीच्या सुरेल आवाजात हे गाणं अगदी सुरेल झालं आहे. या गाण्याला अनुभव गोगोईने संगीत दिलं आहे. बॉलिवूडचा  हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली . त्याचे चाहते आजही त्याच्या आठवणींमध्ये रमताना दिसतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive