By  
on  

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना करोनाची लागण, थांबवलं मालिकेचं शुटिंग

सिनेसृष्टीला लागलेलं करोनाचं ग्रहण काही सुटता सुटत नाहीये. काही दिवसांपुर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा सेटवर करोना झाल्याने निधन झालं होतं. आता अग्गबाई सासूबाई मालिकेतील आसावरी म्हणजेच निवेदिता सराफ यांनाही करोनाची लागण झाली आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राने हे वृत्त दिलंं आहे.

निवेदिता यांना कोणतीच लक्षणं जाणवत नसल्याने सध्या त्या घरीच क्वारंटाइनमध्ये आहेत. निवेदिता यांच्या रिपोर्टनंतर ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील इतर कलाकारांचीही करोना चाचणी करण्यात आली. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

या प्रकारामुळे गेल्या १५ सप्टेंबरपासून मालिकेची शूटिंग थांबवण्यात आलं आहे.  ‘आई माझी काळूबाई’ या २७ जणांना करोनाची लागण झाल्यानंतर ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतही कलाकारांवर हा प्रसंग ओढवल्याने चिंता वाढली आहे. 

 

Source: Loksatta 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive