By  
on  

Exclusive : अमोल पालेकर या सिनेमाचा हिस्सा आहे हे समजताच मी तात्काळ होकार दिला: उपेंद्र लिमये

अलीकडेच zee5 च्या "२००- हल्ला हो" सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, प्रेक्षकांची उत्कंठा फारच वाढली आहे. या सिनेमात बरेच मराठी चेहरे दिसत आहेत. त्यापैकीच एक आहेत अभिनेते उपेंद्र लिमये. उपेंद्र या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत. उपेंद्र यांनी या भूमिकेविषयी अधिक खुलासा केला. ‘ ते म्हणतात, ‘माझ्यासाठी सिनेमा हा कथा सांगण्याचं असं माध्यम आहे जे प्रेक्षकांना बांधून ठेवतं.

 

खरं तर हिंदी सिनेमांमध्ये काम करुन बराच काळ लोटला होता. त्यामुळे २००- हल्ला हो ची ऑफर आली तेव्हा अशा प्रकारच्या कंटेटवर मी ब-याच काळाने हिंदीमध्ये काम करणार होतो. त्याचवेळी या सिनेमात निवृत्त न्यायाधीशाच्या भूमिकेत कोण दिसणार आहे हे कास्टींग डायरेक्टरला विचारलं होतं. सिनेमात अमोल पालेकर या भूमिकेत दिसणार असल्याचं समजताच मी तात्काळ होकार दिला.’

सार्थकी दासगुप्ता दिग्दर्शित, "२००-हल्ला हो" ही गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन गुंडगिरी करणाऱ्या बलात्काऱ्याविरुद्ध कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला. या सिनेमात  ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, सैराट फेम रिंकू राजगुरू आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते  उपेंद्र लिमये अशी तगडी स्टार कास्ट असून हा सिनेमा मराठी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

 

(शब्दांकन: अमृता पाटील-चौगुले)

Recommended

PeepingMoon Exclusive