रक्षाबंधन हा खास भाऊ-बहिणीती नात्याचा गोडवा साजरा करण्याचा दिवस. नेहमी भांडणारा पण आपल्यासाठी जगासमोरही उभा ठाकणारा भाऊ बहिणीसाठी कायमच खास असतो. अभिनेत्री ऋता दुर्गुळेनेही ऑफस्क्रीन भाऊ ऋग्वेद आणि ऑफस्क्रीन भाऊ उमेश कामात यांच्याशी असलेल्या नात्याबाबत शेअर केलं आहे.
भावासोबतचा एखादा धमाल किस्सा सांगू शकशील का?
खरं तर आम्ही खुपच गुणी म्हणू शकतो अशी भावंड होतो. तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. पण माझं आणि त्याचं भांडण असं कधीच झालं नाही. पण माझ्यापेक्षा लहान असला तरी तो खुपच समंजस आहे. त्यामुळेच की काय कधी काहीही झालं तरी मी सगळ्यात पहिला फोन त्यालाच करते. आमच्यात जनरेशन गॅप असला तरी तो कधीही जाणवला नाही. आमच्यातील हेच अंडरस्टॅंडिंग खुप महत्त्वाचं आहे. तो माझ्यासोबत नसणं ही माझी सगळ्यात मोठी भिती आहे.
ऑनस्क्रीन भाऊ उमेश कामत याच्याशी असलेल्या बाँडिंगबाबत काय सांगू शकशील?
सगळ्यात आधी हे सांगू इच्छिते की, आम्ही सगळेच स्टेजवर परफॉर्म करणं खुप मिस करतो आहे. आता उमेश दादाबाबत बोलायचं झालं तर माझी खुप इच्छा होती की मला मोठा भाऊ असावा. या नाटकामुळे आणि उमेशदादामुळे ही इच्छा पुर्ण झाली आहे. धाकटं भावंडं असण्याचं फीलींग मला या नाटकाने दिलं आहे. घरातील मोठं भावंड जणू पालकाप्रमाणे असतं. मी मोठी असल्याने ऋग्वेदबाबत तितकीच पझेसिव्ह आहे. ‘दादा एक गुड न्युज आहे’ मुळे मला हेच गोड नातं मला उमेशदादा सोबत अनुभवता आलं.
ऋग्वेद आणि उमेशकडून तुला रक्षाबंधनचं गिफ्ट घ्यायचं असेल तर काय घेशील?
उमेशदादा खरं तर कामात, अभिनयात माझ्यापेक्षा खुप मोठा आहे. त्यामुळे त्याला मी काय देऊ शकेन हे सांगू शकणार नाही. पण त्याच्याकडून उत्तम व्यक्ती कसं असावं हे मात्र नक्की शिकेन. माझ्या भावाकडून मला एक गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे पेशन्स. तो खुप शांत आहे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये शांत कसं रहावं हे त्याच्याकडून शिकेन.
तुझ्या नव्या मालिकेतील भूमिकेबाबत सांग
मला सांगायला खुप आवडेल की, यापुर्वी मी साकारलेल्या वैदेही आणि दुर्वापेक्षा दीपिका ही व्यक्तिरेखा खुपच वेगळी आहे. मला इतकी वेगळी व्यक्तिरेखा साकारायला मिळते आहे. याचा आनंद होतो आहे. मी इतकंच सांगू शकते ही व्यक्तिरेखा वैदेहीच्या एकदम विरुद्ध आहे.
येत्या ‘अनन्या’ या नव्या सिनेमाबाबतही सांग
हा सिनेमा दीड वर्षापुर्वी रिलीज होणार होता. पण कोविडमुळे त्याचं रिलीज पुढे गेलं आहे. ही व्यक्तिरेखा यापुर्वी दोन अभिनेत्रींनी उत्तम साकारली आहे. अनन्या बाबत मला तुलनेचा ताण नाहीये. पण नव्या माध्यमाचं प्रेशर नक्कीच आहे. त्यात हा माझा पहिलाच सिनेमा आहे. मुळात अनन्या ही व्यक्तिरेखा इतकी ताकदीची आहे. त्या व्यक्तिरेखेचं प्रेशर जास्त आहे. मी इतकंच सांगू शकते की, मी या सिनेमाची ही प्रेक्षकांइतकीच वाट पहाते आहे.