By  
on  

Exclusive: ‘अधांतरी’च्या निमित्ताने ‘Long distance relationship’ बाबत पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री पर्ण पेठे, वाचा सविस्तर

Long Distance Relationship मध्ये असलेल्या मुग्धा आणि मुकुलला जेव्हा काही दिवसांसाठी Compulsory एकत्र राहावं लागतं. त्यावेळी नात्याचे न पाहिलेले पैलू त्यांच्यासमोर येतात. अशा फ्रेश विषयावर ‘अधांतरी’ ही वेबसिरीज बेतली आहे. या सिरीजमध्ये पर्ण पेठे मुग्धाच्या व्यक्तिरेखेत दिसते आहे. या निमित्ताने तिच्याशी केलेली खास बातचीत.... 

 

‘अधांतरी’ मधील मुग्धाच्या व्यक्तिरेखेबाबत सांग 

मुग्धा अतिशय स्वतंत्र विचारांची फेमिनिस्ट मुलगी आहे. मोकळ्या मनाची आहे. मनात येईल ते स्पष्ट मांडणं हा तिचा स्वभाव आहे. आताच्या जनरेशनच्या मुलींचं स्वरुप म्हणजे मुग्धा आहे. रिलेशनशीपबाबत ती खुपच स्पष्ट संकल्पना बाळगणारी आहे. शॉर्ट टेंपर्ड असली तरी मनस्वी अशी तिची व्यक्तिरेखा आहे. 

 

तुझ्या सिद्धार्थसोबतच्या बाँडिंगबाबत सांग

मी आणि सिद्धार्थ एकमेकांना कॉलेजपासून ओळखतो. तो एसपी कॉलेजला तर मी फर्ग्युसन कॉलेजला होते. तेव्हापासून आमची ओळख आहे. अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धांना आम्ही एकत्र असायचो. आम्ही यात बक्षीसही मिळवली आहेत. पण इतक्या वर्षात आम्हाला एकत्र काम करायची संधी मिळाली नव्हती. ती या निमित्ताने मिळाली. या वेबसिरीजचा जवळपास 90 % स्क्रीन टाईम हा आमचा दोघांचा आहे. दोघांनाही कामातील परफेक्शन खास आवडतं. त्यामुळे अनेकदा रिहर्सल्स केल्या जायच्या. सिद्धार्थ अनेकदा माझ्या पुण्यातील घरी रहिला आहे. आम्ही एकत्र प्रवास केला आहे. यामुळे आमचं ऑफस्क्रीन बाँडिंग उत्तम झालंच पण ते स्क्रीनवरही उत्तम जमलं आहे. 

मुग्धाच्या लाँग डिस्टंस रिलेशनशीपशी तुझं पर्सनल आयुष्य कितपत रिलेट होतं? 

नक्कीच होतं. आणि ब-याच अंशी होतं. शुटिंगमुळे आलोकला आणि मला अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी असावं लागतं. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यामुळेही मुग्धाशी खुप चांगलं रिलेट करु शकले. आताही मी पाँडिचेरीमध्ये आहे तर तो पुण्यात आहे. पण आमच्य सिरीजप्रमाणेच या लॉकडाऊनमध्ये आम्ही पहिल्यांदाच एकत्र वेळ घालवला. खरं तर असं पहिल्यांदाच असेल की आम्ही इतका वेळ एकत्र होतो. 

लाँग़ डिस्टंस रिलेशनशीपबाबत तुला आवडलेली चांगली गोष्ट कोणती जी शेअर करशील? 

सतत सोबत असलो आपण खुप जास्त एकमेकांना ओळखायला लागतो. कधी कधी थोडं लांब गेलो की आपला स्वत:कडे पाहायचा दृष्टीकोन बदलतो. आजकालचं युथ नात्याचा बॅलॅन्स कसा साधायचा ते पुरेपूर समजून आहे. खरं तर एकमेकांपासून लांब राहिल्याने स्वत:सोबतच नात्याकडे किंवा जोडीदाराकडेही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येणं शक्य होतं. ही स्पेस नात्यांसाठी आणि दोघांसाठीही गरजेची असते. 

 

 

‘अधांतरी’ बाबत आणखी काय सांगशील? 

मला अधांतरीबाबत हे स्पेशली सांगावं वाटतं की, ही टीम खुप यंग आहे. दिग्दर्शक ओमकार गोखले असो किंवा इतर टीम मेंबर्स. ही सिरीज अनेकांचं पहिलंच प्रोजेक्टही आहे. पण करोनाच्या परिस्थितीत खुप काळजी घेऊन अगदी योग्य पद्धतीने हे शुटिंग पार पडलं. शुटिंग दरम्यानही खुप मजा आली.

Recommended

PeepingMoon Exclusive