Exclusive: सुंदरा मनामध्ये....’ फेम समीर परांजपे करोना पुर्वीच्या गणेशोत्सवातील ही गोष्ट करतो आहे मिस

By  
on  

बघता बघता बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान झाले आहेत. बाप्पांच्या आगमनाने प्रत्येकाच्या मनात आनंद ओसंडून वाहतो आहे. अर्थातच करोनासारखं विघ्नही बाप्पाच्या आगमनाने धुसर झाल्यासारखं वाटत आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम समीर परांजपेलाही बाप्पाच्या आगमनाचा मनस्वी आनंद झाला आहे. त्याच्या सेलिब्रेशनबाबत त्याने पीपिंगमूनशी एक्सक्लूसिव्हली शेअर केलं आहे. 

 

 

गणेशोत्सवासाठी यंदा काय तयारी केली आहेस?

यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खुप स्पेशल आहे. याला कारण म्हणजे माझ्या 9 महिन्याच्या मुलीचा हा पहिला गणेशोत्सव आहे. अनेक वर्षांनी मी ही मुलीच्या पहिला गणेशोत्सवासाठी माझ्या गावी बार्शीला जातो आहे. सो मी यासाठी खुपच एक्साईटेड आहे. 

 

सेटवरच्या गणेशोत्सवाची धमाल कशी असते?

सेटवरही गणेशोत्सवाचं धमाकेदार सेलिब्रेशन सुरु आहे. सगळा सेट जणू लग्नघर बनला आहे. मालिकेतील गणपतीच्या आगमनाचा उत्साह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. त्यामुळे सेटवर सध्या पळा-पळ आणि घाई सुरु आहे. पण हे मनोरंजन तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जाईल. ‘सुंदरा..... मध्येही तुम्हाला एखादं गोड सरप्राईज मिळून जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

 

करोना पुर्वीच्या गणेशोत्सवातील कोणती गोष्ट मिस करत आहेस?

सगळ्यात आधी मी मिस करतो तो म्हणजे बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष. सार्वजनिक मंडळाच्या मिटींग्ज, समुहाने केलेली जय्यत तयारी. तो ओसंडून वाहणारा उत्साह. ढोल, ताशे, लेझीम यांचा नाद मी मिस करतो आहे. 

यंदा गणपती बाप्पाकडे काय मागशील ?

 मी एवढंच मागेन की, करोनाचं आलेलं हे संकट लवकरात लवकर दूर व्हावं. करोना अजून गेलेला नाही. त्याची भिती आहे. त्यामुळे यावर्षी नाही शक्य असलं तरी पुढील वर्षी त्याचं जोरदार स्वागत करायचं आहे. त्यामुळे बाप्पाकडे मी एवढंच मागेन की, या संकटातून सगळ्यांची लवकर सुटका कर. सगळ्यांना समाधानी ठेव. एकत्र येणं हे प्रत्येक सणाचं प्रयोजन आहे. पण सध्या परिस्थितीमध्ये ते शक्य नाही. त्यामुळे आपल्या आसपास जीवलग असण्याचं महत्त्व कळलं आहे. त्यामुळे या संकटातून समजेलेली ही एक सकारात्मक गोष्ट कायम रहावी असं मी बाप्पाकडे मागेन.

Recommended

Loading...
Share