By  
on  

Peepingmoon Exclusive : असाध्य रोगावर आधारित 'निद्राय'विषयी दिग्दर्शक रोहित धिवारची खास मुलाखत

'फेरल फेमिलियल इन्सोपेनिया' या भारतात माहीत नसलेल्या असाध्य रोगावर आधारित 'निद्राय' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'निद्राय'चा हा ट्रेलर खूपच थरारक आहे. 

या चित्रपटात ज्या माणसाला झोपचं लागत नाही असा आजार असलेल्या वडिलांना तिची मुलगी या आजारातून कशी सावरते? अशी गोष्ट 'निद्राय' या चित्रपटातून दाखवण्यात येणार असून सत्य घटनांवर प्रेरित हा चित्रपट आहे.

दिग्दर्शक रोहित धिवार यांनी चित्रपटाविषयी पिपिंगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत सांगितले, "एका हेल्थ चॅनलसाठी मी काम करत असताना मला या आजाराविषयी कळलं आणि यावर चित्रपट करण्याची इच्छा झाली. जगभरात या आजाराचे अनेक पेशंट्स असून या आजाराचं अद्याप निदान झालेलं नाहीये." असंही ते म्हणाले. 

या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून घ्याव्या लागणाऱ्या मेहनतीबद्दल ते म्हणतात, "निद्राय चित्रपट करण्यासाठी यावर मी दोन ते तीन महिने रिसर्च केला. कारण झोप येत नाही असा एखादा आजार असतो याबद्दल कुणाला अद्याप माहिती नाही. त्यामुळे डिस्कव्हरी वरील एक पाच मिनिटांचा व्हिडीओ तसेच जर्मन भाषेतील एका पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करून आणि काही तज्ज्ञांशी बोलून मी या आजाराविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला." असं ते म्हणाले.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Dhiwar (@rohitdhiwar7)

 

या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाविषयी रोहित धिवार म्हणतात की, "या आजाराबद्दल सर्वच जण अनभिज्ञ असल्यामुळे या आजाराचं गांभीर्य प्रत्येकाला पटवून द्याव लागलं. या चित्रपटात अभिनेते मिलिंद फाटक यांनी निद्राग्रस्त आजारी माणसाची भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच चित्रपटात रेवती लिमये हिने आजारग्रस्त वडिलांच्या मुलीची भूमिका केली आहे तर अभिनेता चिराग पाटील याने रेवतीच्या मित्राचे पात्र साकारले आहे. तर अभिनेत्री देविका दफ्तरदार हिने या चित्रपटात डॉक्टरांची भूमिका साकारली आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर हा चित्रपट नावाजला गेला असून आतापर्यंत या चित्रपटाला ९ नॉमिनेशन्स आणि ४ अवॉर्डस मिळाले आहेत. तसेच अनेक फिल्म फेस्टिव्हल्स मध्येही हा चित्रपट दाखवला गेला आहे. २०१९ मध्ये या चित्रपटाची निर्मिती झाली असून नंतरच्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट रखडला होता. पण आता हा चित्रपट प्रदर्शित होतोय, यासाठी आम्ही खुपचं उत्सुक आहोत" असं रोहित धिवार म्हणाले.

 

ब्लॅक वॉल फिल्मची निर्मिती असलेल्या रोहित धिवार, शंतनू यादव निर्मित व रोहित धिवार दिग्दर्शित ‘निद्राय’ हा मराठी चित्रपट एम.एक्स. प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive