Peepingmoon Exclusive :

By  
on  

'पांघरूण', 'वरण भात लोणचं, कोण नाय कोणचं' यासारख्या अनेक आशयघन आणि वास्तववादी सिनेमांच्या निर्मिती नंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर हे त्यांचा आगामी दे धक्का २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. याच सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने त्यांनी पिपिंगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत बिगबॉस मराठीच्या आगामी पर्वाबद्दल काही खुलासे केलेत. बिगबॉस मराठीच्या ३ पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते, मात्र यंदाच्या पर्वात हा शो कोण होस्ट करणार याविषयी सिनेसृष्टीत बरीच चर्चा सुरू आहे.

दरम्यान चौथ्या सिजनच्या होस्टिंग बद्दल महेश मांजरेकर यांना विचारले असता महेश मांजरेकर यांनी असे सांगितले की, "बिगबॉस मराठी सोबत माझा ३ वर्षांचा करार होता, जो मी इमानेइतबारे केला. पण आता तीन वर्षांचा करार संपल्यानंतर चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार हे मला माहित नाही. तसंच चौथ्या सिजनचं हॉस्टिंगदेखील मी करण्यासाठी मी बांधील नाही, किंवा चॅनेलदेखील बांधील नाही."

यापुढे ते असे म्हणाले की, "पण बिगबॉसच्या आगामी पर्वासाठी मला विचारले तर मी पुन्हा तितक्याच जोमाने हा शो होस्ट करेन आणि जरी नाही विचारले तरी तितक्याच आवडीने मी हा शो पाहीन" असं दिग्दर्शक महेश मांजरेकर यावेळी म्हणाले. दरम्यान बिगबॉस मराठी ४ साठी बिगबॉसचे अनेक चाहते उत्सुक आहेत. यंदाच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसोबतंच हा शो होस्ट कोण करणार याविषयी कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share