PeepigmoonMarathi Exclusive : अमृता फडणवीस यांनी देवेंद्रजींसाठी घेतला हा खास उखाणा

By  
on  

अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या धमाकेदार गाण्यांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या प्रत्येक गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसून येते. सध्या व्हायरल होत असलेल हे गाणं बॅचलर पार्टीच्या कॉन्सेप्टवर आधारित आहे. यामध्ये अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस लुक चांगलाच चर्चेत आला आहे. लोकप्रिय टी सिरीजचने हे गाणं प्रसिध्द केलं आहे. अमृता फडणवीस ह्यांनी हे गाणं गाण्ययाबरोबरच यात ठुमकेही लगावले आहेत. 

मूड बनालिया या पंजाबी गाण्याच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने अमृता देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत घेतली. तेव्हा गाण्याच्या चर्चांसोबतच देवेंद्रजी आणि त्यांच्या लेकीची त्यांनी गायलेली कोणती गाणी आवडतात हेसुध्दा जाणून घेतलं. त्यानंतर उखाणा घेण्याचा त्यांना आग्रह केला तेव्हा. अमृताजींनी लग्नात घेतलेला खास उखाणा यावेळी घेतला. 

 

 

 

यावेळी अमृता फडणवीसांनी उखाणा घेत म्हटलं, 'मी फिरते मळ्यात.. नजर माझी तळ्यात.. देवेंद्रजींसारखे रत्न पडले माझ्या गळ्यात'. असा उखाणा घेत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा उखाणा आपण आपल्या लग्नात घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अमृता फडणवीस सतत मुलाखतींमध्ये आपल्या लग्नाबाबत आणि आपल्या कुटुंबाबत किस्से शेअर करत असतात. हा उखाणा सध्या चांगलाच पसंत केला जात आहे. 

Recommended

Loading...
Share