Exclusive: तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींना कुणाला घेऊन जायचंय व्हॅलेंटाईन डेटवर जाणून घ्या

By  
on  

 आज प्रेमाचा गुलाबी बहर सर्वत्र पसरलाय. या प्रेमोत्सवात आकंठ बुडून जायला सर्वच आतुर आहेत. व्हॅलेंटाईन डेला अनेकांचं काही ना काही खास प्लॅनिंग असतं. आपल्या खास व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या खास दिवशी अनेकजण प्रयत्न करत असतात. तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे प्लॅन काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न पीपिंगमूनने केला आहे. 

 

हृता दुर्गुळे: 

खरं तर मला व्हॅलेंटाईन डेटसाठी कुठेतरी बाहेर जाण्याऐवजी माझ्या घरीच काहीतरी प्लॅनिंग करायला आवडेल. कारण आजकाल वेळ काढणं खुप अवघड झालं आहे. त्यामुळे घरी दोघांच्या आवडीची थीम प्लॅनिंग करून व्हॅलेंटाईन मेमोरेबल बनवायला आवडेल. याशिवाय माझी अशी संधी मिळाली की सेलिब्रिटीसोबत व्हॅलेंटाईन स्पेंड करायचा आहे तर मी दाक्षिणात्य कलाकार विजय देवरकोंडासोबत मला व्हॅलेंटाईन डेटवर जायला आवडेल. मी त्याच्या अभिनयाची खुप चाहती आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Sunday ️ Clicked By @deepali_td HMU By @smrutibhurke_mua

A post shared by Hruta (@hruta12) on

 

 

 

ललित प्रभाकर:

मला टिपीकल गोष्टींना फाटा देत कुठेतरी खास ठिकाणी प्रवास करायला आवडेल. असं ठिकाण जे माझ्या आणि माझ्या प्रिय व्यक्तीच्या आवडीचं असेल. खासकरून अशा ठिकाणी जिथं मानवी हस्तक्षेप कमी आणि निर्सग मुळ रुपात अनुभवता येईल. पण मला कुणा सेलिब्रिटीला व्हॅलेंटाईन डेटवर घेऊन जाण्याची संधी मिळाली तर प्रसिद्ध थिएटर कलाकार अरुंधती नाग यांच्यासोबत वेळ घालवायला आवडेल. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे. 

 

सई लोकूर: 

मी खुपच रोमॅंटिक आहे. त्यामुळे या दिवशी मला काहीतरी स्पेशल करायला नक्कीच आवडेल. माझ्या आवड्त्या व्यक्तीसोबत त्यादिवसाचे 24 ताससोबत घालवायला आवडेल. याशिवाय त्याच्यासाठी काहीतरी खास डिश बनवणं, लाँग ड्राईव्हवर जाणं, खुप गप्पा मारणं या गोष्टी करायला मला आवडतील. पण जर मला एखाद्या सेलिब्रिटीला डेटवर घेऊन जाण्याची संधी मिळाली तर मी अंकुश चौधरीला घेऊन जाईन. अंकुशसोबत मी यापुर्वीही काम केलं आहे. त्यामुळे तो माझा चांगला मित्र आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

All of me loves all of you ️ #torontodiaries

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 

भुषण प्रधान:

मला वाटतं सगळ्यात स्पेशल आहे आज वेळ देणं. कारण आपण एखाद्या व्यक्तीसाठी आवर्जुन वेळ देतो तेव्हा ती व्यक्ती आपल्यासाठी खुप खास बनली असते. त्यामुळे माझ्या ड्रीम व्हॅलेंटाईन डे प्रत्येक क्षण मी आवड्त्या व्यक्तीसोबत राहीन. यासोबतच जर मला एखाद्या सेलिब्रिटीसोबत डेटवर जाण्याची संधी मिळाली तर ती व्यक्ती माधुरी दीक्षित असेल. हीच एक व्हॅलेंटाईन डेट आहे जिची मी वर्षानुवर्षं वाट पाहत आहे.

Recommended

Loading...
Share