सध्या ड्रग्स प्रकरणामुळे बॉलिवूड पुरतं हादरुन गेलं आहे. अनेक मोठी नाव यात समोर येतायत, प्रामुख्याने यात अनेक प्रसिध्द अभिनेत्रींची नावे आघाडीवर आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी अभिनेत्री राकुल प्रित सिंग आज 25 सप्टेंबर रोजी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, राकुल प्रित सिंग आणि सारा अली खान यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती.
पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात साराचं नाव समोर आल्याने बॉलिवूडचा नवाब आणि साराचे वडील अभिनेता सैफ अली खान बराच चिंतेत आहे. या ड्रग्स माफिया प्रकरणात लेक साराचं नाव संशयित म्हणून पुढे आल्याने तो अस्वस्थ झाला आहे. साराची एनसीबीकडून याप्रकरणी येत्या 28 सप्टेंबर रोजी चौकशी होणार आहे. सध्या सारा गोव्यात होती मात्र समन्स मिळताच ती आई अमृता सिंगसोबत व भाऊ इब्राहिमसोबत मुंबईला येण्यासाठी काल रात्रीच रवाना झाली.
सूत्रांनी पिपींगमूनला पुढे हेसुध्दा स्पष्ट केलं की, साराचं आज जे काही ड्रग्स माफीया प्रकरणात नाव आलं आहे, त्यासाठी सैफ अली खानने तिची आई आणि आपली पूर्व पत्नी अमृता सिंगला जबाबदार धरलं आहे. साराचं पालनपोषण व तिचं एकूणच करिअर यासर्वांकडे फक्त अमृताच जातीने लक्ष द्यायची. यावरुनच अमृताचं साराकडे नीट लक्ष नसल्यचं दिसतंय. त्यामुळे सैफने अमृतालाच दोष लावला आहे. म्हणूनच तो साराला या प्रकरणातून बाहेर काढण्यात कुठलीच मदत करणार नसल्याचं बोललं जात आहे.
तसंच कुठल्याही खात्रीविना असंसुध्दा समजतंय की सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्षा आणि साराच्या आजी अभिनेत्री शर्मिला टागोर या साराला या प्रकरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सारा अली खान आणि सुशांतसिंह राजपूतने केदारनाथ सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.