बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमार स्टारर आगामी बेलबॉटम सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं असून त्याची रिलीज डेटसुध्दा आजच अक्षयने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन उलगडली.1980 काळात घडलेल्या कथानकावर आधारित थ्रीलर पठडीतला बेलबॉटम हा सिनेमा करोना पार्श्वभूमीवर आपलं शूटींग नियोजितरित्या पूर्ण करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. बरीच आव्हानं पेलत 'बेल बॉटम' हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज होतोय.
हिंदी सिनेमांच्या शूटींग वेळेच्या योग्य कार्यप्रणालीचं 'बेल बॉटम' हे एक आत्ता उत्तम उदाहरण म्हणून सर्वांसमोर आहे. करोना काळातसुध्दा परदेशात शूटींगचं आव्हान लिलया सिनेमाने पेलल्याचं दिसतंय. पिपींगमूनला याबाबत सूत्रांनी एक्सक्ल्युझिव्ह दिलेल्या वृत्तानुसार 200 हून अधिक भारतीय कास्ट व क्रूची टीम या शूटिंगसाठी दिवसाचे 24 तास ग्लासगो येथे अविरत झटत होती. ग्लासगो हे स्कॉटलंडमधील सर्वात मोठं शहर आहे.
या शूटींग शेड्यूलबद्दल बोलताना एका सूत्राने सांगितलं, “ ग्लासगो येथे आम्हाला नेमून दिलेया मार्गावरुनच फक्त आम्हाला येण्या-जाण्याची मुभा होती असं बेलबॉटमच्या एका सूत्राने सांगितलं. करोनामुळे आम्हाला ग्लासगो शहरात कुठेही फिरण्यास बंदी होती. आम्हाला फक्त आमच्या आमच्यातच रहावं लागायचं. हॉटेलमधून कारमध्ये आणि कारमधून शूटींग लोकेशनवर व शूट संपल्यावर पुन्हा त्याच मार्गाने परत. हाच दिनक्रम ठरलेला असायचा. करोनामुळे तिथले कायदे प्रचंड कठोर करण्यात आले होते.”
बेलबॉटम सिनेमाचे निर्माते वासू भगनानी आणि निखील अडवाणी यांनी आपल्या भारतीय क्रू मेंबर्सच्या खाण्या-पिण्याचीही योग्य ती सर्व काळजी घेतली. “ग्लासगोमध्ये भारतीय, दक्षिण भारतीय व इटालियन पदार्थ करण्यासाठी शेफची योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. . त्यामुळे कोणाच्याच खाण्या-पिण्याची आबाळ झाली नाही. हे सर्व आवडीचं खाणं योग्य ती सुरक्षेची काळजी घेत बनवलं जात होतं व शूटींग सेटवरही ते पोहचवण्यात यायचं ,” असं या सूत्राने पुढे स्पष्ट केलं.
तसंच रात्री आम्ही शूटींग पूर्ण केल्यावर पॅकअपनंतर संपूर्ण सेट निर्जुंतुक करण्यात यायचा, जेणेकरुन दुस-या दिवशी सुरक्षितरित्या आम्ही शुटींग सुरु करु असं तो सूत्र म्हणाला.
लॉकडाउननंतर परदेशात चित्रीकरण होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमाचं स्कॉटलॅण्डमध्ये चित्रीकरण पार पडलं असून हा सिनेमा २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचं दिग्दर्शन रंजित तिवारी यांनी केलं आहे.