हायकोर्टाच्या परिसरातून अशा बातम्या येत आहेत की बॉलिवूडचे प्रॉडक्शन हाऊसेस रिपब्लिक टिव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता पुढ्चं पाऊल उचलणार आहेत. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली कळालं आहे की, बॉलिवूडची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी वरील दोन चॅनेल्ससह आज तक आणि एबीपी न्युज विरोधातही तक्रार दाखल केली जाणार आहे.
[BREAKING] Suit has been filed before Delhi High Court by four Bollywood industry Assns & 34 leading Bollywood producers AGAINST
Republic TV
Arnab Goswami
Pradeep Bhandari
Times Now
Rahul Shivshankar
Navika Kumar @navikakumar @pradip103 @RShivshankar #ArnabGoswami pic.twitter.com/NXAP4w1Uvp— Bar & Bench (@barandbench) October 12, 2020
यावेळी DSK Leagal ने ही बाब कंफर्म केली आहे की, केवळ चॅनेल, डिजीटल प्लॅटफॉर्मच नाही तर John Doe/Ashok Kumar या नावाने बॉलिवूडची बदनामी करणा-यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे.
याशिवाय एक प्रथितयश डिजीटल प्लॅटफॉर्म विरोधातही तक्रार केली जाणार आहे.
DSK Leagal म्हणतात, ‘ ही बाब सर्व डिजीटल आणि टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मना लागू पडते आहे. बॉलिवूडवर कोणत्याही प्रकारची चिखलफेक सहन केली जाणार नाही. हिंदी सिनेमाचे मान्यवरांनी दिल्ली हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे. रिपब्लिक टिव्ही आणि टाईम्स नाऊने सुशांत सिंग राजपुत प्रकरणात बॉलिवूडवर बरीच चिखलफेक केली.
प्रतिमा मलीन करत नशेच्या आहारी गेलेलं क्षेत्र असं संबोधलं. फिर्यादींच्या यादीमध्ये प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया, द सिने अॅण्ड टीवी आर्टिस्ट असोसिएशन, फिल्म अॅण्ड टीवी प्रोड्यूसर कॉउन्सिल, स्क्रीनराइटर असोसिएशन यांचा समावेश आहे.