बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या पारडं नेहमीच सिनेमांनी भरलेलं असतं. पण प्रत्येक सिनेमांचं शूटींग शेड्यूल काटेकोरपणे पाळत प्रत्येक भूमिकेला 100 टक्के न्याय देण्यात हा खिलाडी चांगलाच तरबेज आहे.
बेलबॉटमचं परदेशातलं शूटींग संपवून अक्षय कुमारने त्याच्या बिग बजेट पृथ्वीराजच्या शूटींगला सुरुवात केली. यात त्याची नायिका मानुषी छिल्लर आहे. या सिनेमाच्या शेवटचं शेड्यूल सध्या अक्षय पूर्ण करतोय. दिवाळीपर्यंत पृथ्वीराजचं शूटींग संपेल असं बोललं जात आहे. पण नुकतीच एक बातमी या सिनेमाच्या सेटवरुन पिपींगमूनच्या हाती लागली आहे.
पृथ्वीराजचं शूटींग करताना एका सीनसाठी तोल ढासळल्याने अभिनेता अक्षय कुमार घोड्यावरुन खाली कोसळला. घोडेस्वारी करताना झालेल्या या छोट्याशा अपघातात अक्षयला मात्र कुठलीच दुखापत झाली नाही. घोडा लगेच अक्षयच्या अंगाव धावून येऊ लागला, म्हणून शूटींग थांबवण्यात आली. परंतु अक्षयने स्वत:ला सावरलं आणि पुन्हा शॉट देऊन ती शूटींग पूर्ण केली. त्यामुळे सेटवर सर्वांनीच खिलाडी कुमारचं कौतुक केलं.
पृथ्वीराज सिनेमा हा युध्दनितीवर आधारीत वॉर ड्रामा आहे. यात मोठ्या प्रमाणावर युध्दाचे सीन शूट करण्यात येणार होते, परंतु करोनाच्या संकटामुळे ते आता शक्य नाही. म्हणून निर्मात्यांनी आता हे सीन 50 लोकांच्यासोबत स्टुडिओतच शूट करण्या निणय घेतला. खरंतर अशाप्ररकारच्या युध्दाच्या सीन्ससाठी 400 ते 500 जणांच्या मॉबची आवश्यकता असते. पण आता तशी परिस्थिती नाही. म्हणूनच स्पेशल इफेक्ट्स आणि वीएफएक्सचा सिनेमात बराच वापर करण्यात येणार आहे.