लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. मोठे सिनेमे असो किंवा छोटे सर्वांनाच याचा फटका बसला. यापैकीच एक मोठा फटका बसला तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या बिग बजेट एक्शनपटाला. हा सिनेमा रिलीजच्या तोंडावर असतानाच मागच्यावर्षी देशातलं पहिलं लॉकडाऊन जाहीर झालं होतं. आता या सिनेमाबाबत अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. पण पिपींगमूनकडे एक्सक्ल्युझिव्हरित्या सूर्यवंशीच्या प्रदर्शनाबाबतची माहिती आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.
पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, करोनाच्या दुस-या लाटेवर जर येत्या दोन महिन्यात नियंत्रण मिळवण्यात यस आलं आणि परिस्थिती पूर्वपदावर आली व सिनेमगृह सुरु करण्यास अनुकुलता मिळाली तर येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी बहुचर्चित सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित होईल. तर दुसरीकडे अक्षय कुमारचाच बेलबॉटम हा सिनेमा एमेझॉन प्राईम या ओटीटीव्हर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच या प्रजर्शनासाठीसुध्दा स्वातंत्र्यदिनाच्याच तारखेवर मेकर्सची पसंती आहे. रिपोर्टनुसार मेकर्सनी डिजीटल प्रिमीयरसाठी एमेझॉन प्राईमला स्पाय ड्रामा बेलबॉटम विकल्याचं कळतंय.
बहुचर्चित सूर्यवंशीचे निर्माते रोहित शेट्टी पिक्चर्स, धर्मा प्रोडक्शन, केप ऑफ गुड फिल्म्स आणि रिलायन्स एन्टरटेन्मेन्ट हे थिएटर्स मालकांशी सतत थिएटर्स सुरळीत होण्याबाबत चर्चा करतायत. पण सर्वकाही हे सरकारच्या येत्या धोरणांवर आणि लॉकडाऊनच्या नियमांवर व करोना परिस्थितीवर अवलंबून आहे. पण हा सिनेमा जर भविष्यात ओटीटीवर रिलीज झाला तर तुम्ही आश्चर्य न केलेलंच बरं.