PeepingMoon Exclusive: कंगना राणौत निर्मित सिनेमात इरफान करत असलेली भूमिका नवाजुद्दीनकडे?

By  
on  

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याने 29 एप्रिल 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने असंख्य चाहते शोकसागरात बुडाले. एका प्रतिभावान कलाकाराला आपण मुकलो. या कलाकारासोबत काम करण्याचं अनेक अभिनते, दिग्दर्शक निर्माते यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. असंच एक प्रोजेक्ट होतं ज्यात इरफान प्रमुख भूमिका साकारणार होता. दिग्दर्शक साई कबीर यांचा Divine Lovers  हा सिनेमा. इरफानसोबत घोषित झालेलं हे त्याचं शेवटचं प्रोजेक्ट होतं. 

पिपींगमून डॉट कॉमला एक्सक्लुझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार, बॉलिवूडचा एक प्रतिभावान अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा  नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पदरात आता इरफानचं हे प्रोजेक्ट पडलं आहे. अभिनेत्री कंगना राणौत या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळतेय. यासिवाय कंगना या सिनेमात इरफानसोबत अभिनेत्री म्हणूनही झळकणार होती, परंतु तारखांच्या कारणास्तव तिने भूमिका करण्यास नकार दिला होता. आता ्अभिनेत्री झरीन खान या सिनेमात नायिका म्हणून नवाजुद्दीनसोबत झळकणार असल्याचं कळतंय. परंतु अद्याप या सिनेमाबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. 

या सिनेमाचा दिग्दर्शक साई कबीरच्या म्हणण्यानुसार, हा सिनेमा एक विनोदी थरारपट आहे. या सिनेमातील पठाणी नायिकेच्या लुक्समध्ये झरीन अगदी तंतोतंत बसते. ही मध्यमवर्गीयांच्या आयुष्यावर बेतलेली कथा आहे. 

 

साई कबीर आणि कंगना राणौत या दोघांनी रिव्हॉल्वर राणी या सिनेमासाठी यापूर्वी एकत्र काम केलं होतं. 

Recommended

Loading...
Share