PeepingMoon Exclusive: अक्षय कुमारच्या आगामी सिनेमा असेल तमिळ सुपरहिट 'Ratsasan' चा रिमेक

By  
on  

दोन आठवड्यांपूर्वी पिपींगमून डॉट कॉमने तुम्हाला सांगितलं होतं की, बेलबॉटम सिनेमानंतर अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा वासू भगनानी  आणि रणजीत तिवारी यांच्यासोबत करणार आहे. आता या सिनेमाशी निगडीत सविस्तर माहिती आमच्यापर्यंत आली आहे. 

हा सिनेमा 2018 चा तमिळ सुपरहिट  'Ratsasan' चा हिंदी रिमेक असेल. सायको इनव्हेस्टिगेटिव्ह पठडीच्या या थ्रीलर सिनेमात अक्षय कुमार हा विष्णू  विशालच्या भूमिकेत दिसेल. तर अक्षयसोबत या सिनेमात त्याची नायिका म्हणून दाक्षिणात्य इंंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी रकुल प्रित सिंह झळकणार आहे. ह्या सिनेमाचं सध्या प्री-प्रोडक्शन सुरु आहे. ऑगस्टमध्ये लंडनला या सिनेमाचं बायो-बबल प्रोटोकॉलनुसार शुटींग सुरु होणार आहे. या आगामी सिनेमाची संपूर्ण टीम  स्टार्ट-टू-फिनिश शेड्यूलसाठी ५ ऑगस्ट रोजी लंडनला रवाना होणार आहे. 

 

IMDb वर ह्या तमिळ सिनेमाला टॉप रेटिंग्ज मिळाले आहेत. 

Recommended

Loading...
Share