बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या ओटीटी डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. माधुरी नेटफ्लिक्सची वेबसिरीज फाईंडिंग अनामिकामध्ये प्रमुख भूमिकेत झळकतेय. यात ती सुपरस्टार अभिनेत्रीच्या भूमिकेतच दिसेल.ही सुपरस्टार एक पत्नी आणि आईसुध्दा आहे. पण ह्या वेबसिरीजचं कथानक तेव्हा वळण घेतं जेव्हा ही सुपरस्टार अचानक गायब होते. या वेबसिरीजचं शूटींग सध्या सुरु असून यंदा वर्षाखेर त्याचा प्रिमियर होईल. परंतु आता पिपींगमूनच्या हाती एक एक्स्क्ल्युझिव्ह बातमी आली आहे. माधुरीने आपली डिजीटल डेब्यू सिरीज 'फाइंडिंग अनामिका' सोबतच आणखी एक वेब प्रोजेक्ट साईन केलं आहे.
इंडस्ट्रीच्या सूत्रांनुसार, माधुरी दीक्षित एमेझॉन प्राईम व्हिडीओसाठी एक फिचर फिल्म करतेय. हा एक फॅमिली ड्रामा प्रोजेक्ट आहे. याचं नाव मेरे पास मां आहे. 1975 चा सुपरहिट क्लासिक सिनेमा दिवारचा हा एक प्रसिध्द डायलॉग अभिनेते शशी कपूर यांचा आहे. अभिनेत्री अंगिरा धरने ज्या दिग्दर्शकासोबत लग्नगाठ बांधली ते आनंद तिवारी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय.
आनंद यांनी यापूर्वी 'गर्ल इन द सिटी', 'लव पर स्क्वेयर फुट (2018)' आणि एमेझॉन प्राइम सीरीज़ 'बैंडिश बैंडिट्स' चं दिग्दर्शन केलं आहे. आनंद आणि अमृतपाल सिंह बिंद्रा यांची स्टिल एन्ड स्टिल मीडिया च्या अंतर्गत बननणारा हा सिनेमा पुढच्यावर्षी फ्लोअरवर जाईल.