Exclusive: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची क्राईमब्रांच कडून एकत्रित चौकशी

By  
on  

पॉर्न सिनेमे बनवल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आज कोर्टात हजर केलं गेलं. तीन दिवस पोलिस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने त्याच्या कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ केली आहे. 

 

आत क्राईम ब्रांचचे ऑफिसर राजला घरी घेऊन गेले. तिथे या दोघांचीही एकत्रित चौकशी झाली. शिल्पा राजच्या या बिझनेसमध्ये पार्टनर असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय या बिझनेसमधील काही पैसेही शिल्पाच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात होते. याशिवाय यातील कटेंट शिल्पाला विचारुन ठरवला जात असल्याचंही बोललं जात आहे.

Recommended

Loading...
Share