PeepingMoon Exclusive: पती राज कुंद्राच्या पॉर्नफिल्म्स निर्मिती व्यवसायात शिल्पा शेट्टीचा सक्रीय सहभाग होता का ? पोलिस चौकशीत आश्चर्यकारक माहिती आली समोर

By  
on  

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली गेली आहे.

मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांनी वाढ करुन ती २७ जुलैपर्यंत केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने  जुहू येथील शिल्पा आणि राज यांच्या घरावर छापा टाकला.  पोलीस कुंद्रा यांना घेऊन थेट त्यांच्या जुहूतील घरी दाखल झाले.  शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर  तब्बल सहा तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले. शिल्पाने या चौकशीत आपल्याला पती राज यांच्या हॉटशॉट एपच्या कंटेटबद्दल सविस्तर असं काहीच माहित नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. हॉटशॉट एपशी काहीही संबंध नसल्याचा शिल्पाने स्पष्ट केलं आहे.

शिल्पाने पुढे असेही आरोप केले की राज कुंद्राचे पार्टनर त्याच्या नावाचा गैरवापर करतायत. तसंच शिल्पाच्या बॅंक अकांऊट्मधून पैशांचे व्यवहार का करण्यात आले याची तिलाही कल्पना नाही. तसंच तिने पुढे एक महत्त्वाचा मुद्दा असासुध्दा उपस्थित केला की, कुंद्रा यांच्या फिल्म्समध्ये कुठल्याही मुलीवर न्यूड सीन्स देण्यासाठी दबाव आणण्यात आला नाही. जर तसा दबाव असेल तर त्यांनी त्याचवेळेस तक्रार का दाखल केली नाही. आम्हाला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत असल्याचं शिल्पाने गुन्हे शाखेच्या अधिका-यांना सांगितलं आहे. 

 

Recommended

Loading...
Share