Exclusive: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ 19 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

अक्षय कुमारच्या आगामी बेल बॉटम सिनेमाबाबत चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा आता 19 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजत आहे. हा सिनेमात ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं बोललं जात होतं. अक्षय, निर्माता जॅकी भगनानी (पूजा एंटरटेनमेंट) आणि निखिल आडवाणी (एम्मी एंटरटेनमेंट) यांना या संदर्भात चांगली डील मिळाल्याचंही बोललं जात होतं.  

 

अक्षयने  या अफवेचं खंडन करत 27 जुलैला सिनेमा रिलीज होईल असं सांगितलं होतं. त्यानंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलून ऑगस्टमध्ये नेली. करोना नंतर थिएटरमध्ये रिलीज होणारा हा पहिला सिनेमा असून 19 ऑगस्टला थिएटरमध्येच रिलीज होणार आहे. जॅकी भगनानी निर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन रंजित तिवारी यांनी केलं आहे.

Recommended

Loading...
Share