PeepingMoon Exclusive: पोलिसांनी केली सिध्दार्थ शुक्लाच्या अपघाती निधनाची नोंद

By  
on  

मालिका विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतली कुपर रुग्णालयाने दिली आहे. तो ४० वर्षांचा होता. त्याच्या निधनाने अवघं कलाविश्व हादरुन गेलं आहे. 

सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. तीन डॉक्टरांच्या टीमने त्याच्या मृतदेहाचं पोर्स्टमॉर्टेम केलं त्यात त्याच्या शरीरावर कुठल्याच जखमा आढळल्या नाहीत. 

पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्हरित्या मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सिध्दार्थ त्याच्या रुममध्ये अगदी मूर्च्छित अवस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला कुपर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Recommended

Loading...
Share