PeepingMoon Exclusive: सिद्धार्थ शुक्लाला मृत अवस्थेत कथितपणे शहनाज गिलने पाहिलं, पोस्टमार्टमसाठी बनवली स्पेशल टीम

By  
on  

हिंदी टेलिव्हिजन स्टार आणि बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं आज सकळी अचानक निधन झालं. सिद्धार्थच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी याला एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट (एडीआर) च्या अंतर्गत दाखल केलीय. 

कूपर रुग्णालयात आज सकाळी सिद्धार्थला मृत घोषित करण्यात आलं होतं. पोस्टमार्टम करण्यासाठी आता तीन डॉक्टरांची विशेष टीम नेमण्यात आलीय. सिद्धार्थला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलय की त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची निशाण नाहीत.

असं बोललं जातय की सिद्धार्थला गंभीर ह्रदयविकाराचा झटका बसला आणि झोपेतच त्याचा मृत्यू झालाय. सिद्धार्थची आई आणि कथित गर्लफ्रेंड शहनाज गिल यांनी त्याला त्याच्या बेडरुममध्ये मृत अवस्थेत पाहिलं होतं. सध्या डॉक्टर सिद्धार्थच्या मेडिकल इतिहासाचा तपास करत आहेत. हे देखील पडताळून बघणार आहेत की सिद्धार्थ कोणतं औषध घेत होता. 

 

Recommended

Loading...
Share