By  
on  

PeepingMoon Exclusive: शहनाज गिलने मुंबई पोलिसांना सांगितलं की, "माझ्या मांडीवर त्याचं डोकं होतं..."

टेलिव्हिजन स्टार सिद्धार्थ शुक्लाची कथित गर्लफ्रेंड शहनाज गिल ही सिद्धार्थची प्रकृती बिघडली तेव्हा त्याच्यासोबत होती. सिद्धार्थला जेव्हा अस्वस्थ वाटत होतं तेव्हा शहनाज त्याच्यासोबत असल्याचं समोर आलय. नुकतच शहनाजने पोलिसांजवळ तिचा जबाब नोंदवलाय. ज्यात तिने त्या रात्री काय घडलं याविषयी सांगितलं. 

शहनाजने पोलिसांना सांगितलं की तिने सिद्धार्थला उठवण्याचा प्रयत्न केला. त्याचं डोकं तिच्या मांडिवर होतं. पण त्याचं शरीर थंड पडलं होतं. तेव्हा शहनाजला लक्षात आलं की सिद्धार्थ हे जग सोडून गेलाय. हे सगळं सिद्धार्थला कूपर रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच घडलं होतं.

 शिवाय त्या रात्री शहनाज सिद्धार्थसोबत होती. पुढे शहनाजने पोलिसांना सांगितलं की बुधवारी संध्याकाळी सिद्धार्थला अस्वस्थ वाटत होतं. तेव्हा शहनाजने त्याला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला होता. तिने सांगितलं की त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आता शहनाज सिद्धार्थच्या जाण्यानं पूर्णता कोसळली आहे. 

 शहनाजसाठी सिद्धार्थ हा तिचा मुंबईतील परिवार होता. बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थसोबत शहनाजही स्पर्धक म्हणून दिसली होती. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive