Exclusive: या दुखण्याच्या इलाजासाठी अजय देवगण म्युनिकला रवाना?

By  
on  

मागील वर्षी जूनपासून अजय देवगण घोटा आणि टाचेच्या दुखण्यामुळे त्रस्त होता. पण अलीकडे त्याचा हा त्रास कमालीचा वाढला आहे. त्यामुळे या उपचारासाठी अजय लवकरच जर्मनीला रवाना होणार असल्याचं समजत आहे. पीपिंगमूनशी बोलताना अजय म्हणतो, ‘अनेक तास उभं राहणं, शुटमध्ये सतत काम करणं आणि अनेकदा चुकिची पादत्राणं वापरल्याने पायाच्या नसांवर अनावश्यक ताण आला होता. पण आता घोट्याचं दुखणं इतकं वाढलं आहे की, बरं वाटण्यासाठी मला फिजिओथेरपिस्टची मदत घेण्याशिवाय पर्याय नसतो.’

जून २०१८पासून अजयचं शेड्युल टाईट असल्याने त्याला या दुखण्यावर इलाज करण्यासाठी निवांत वेळ मिळत नव्हता. पण आता अजयकडे या दुखण्यावर इलाज करून घेण्याशिवाय पर्याय नाही. फॅमिलीसोबत इटलीमध्ये सुट्ट्या घालवत असलेला अजय त्यानंतर म्युनिकला रवाना होणार आहे. एक आठवडा तिथे राहिल्यानंतर  'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या सिनेमाच्या शुटिंगसाठी हैद्राबादला जाण्याची शक्यता आहे. हा सिनेमा एक बायोपिक आहे. अजय यात स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Recommended

Loading...
Share