Exclusive: अली अब्बास जफर दिग्दर्शित आगामी रोमँटिक सिनेमात झळकणार अनन्या पांडे आणि ईशान खट्टर

By  
on  

'स्टुडंट ऑफ द इयर 2' या आपल्या पहिल्याच सिनेमातून अभिनेत्री अनन्या पांडे हे नाव बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झालं. 'स्टुडंट ऑफ द इयर 2'च्या यशानंतर अनन्याकडे सध्या अनेक चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स आहेत. 

'स्टुडंट ऑफ द इयर 2' नंतर अनन्या मुदस्सर अझीझ यांच्या 'पती, पत्नी और वो' या सिनेमात अभिनय करणार आहे. हा सिनेमा १९७८ साली आलेल्या दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा अधिकृत रिमेक आहे. 

पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार अभिनेते चंकी पांडे यांची ही हरहुन्नरी मुलगी 'पती, पत्नी और वो' नंतर आणखी एका सिनेमात झळकणार आहे. सलमान खानच्या 'भारत' सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर लवकरच एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला  घेऊन येत आहेत. 'काली पिली' हे या सिनेमाचे नाव आहे. 

या सिनेमात अनन्यासोबत अभिनेता ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. ईशानने २०१८ साली 'धडक' या सुपरहिट सिनेमातून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. एकापाठोपाठ एक चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स असल्याने सध्या अनन्याचा आनंद शिगेला पोहोचला आहे. 

'पती, पत्नी और वो' सिनेमात अनन्या कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. ''कार्तिकसोबत काम करणं हे एखाद्या स्वप्नासारखं आहे'' असं अनन्याने मत व्यक्त केलं. आता अनन्या आणि ईशान ही नवी जोडी येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवणार का? हे लवकरच कळून येईल. 

Recommended

Loading...
Share