Exclusive: यशराजच्या 'या' हॉलिवूड रिमेकमध्ये सिद्धांत चतुर्वेदीची वर्णी

By  
on  

गली बॉयमध्ये झळकलेला सिद्धांत चतुर्वेदी यशराजच्या आगामी सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती पण सिनेमा कोणता असणार हे मात्र नक्की नव्हतं. पण पिपींगमूनला मात्र हे समजलं आहे. सिद्धांत आता यशराजच्या हॉलिवूडच्या ‘द डिपार्टेड’च्या रिमेकमध्ये झळकणार आहे. सुनीर खेत्रपाल या सिनेमाचे निर्माते असतील. शिमित हा सिनेमा दिग्दर्शित करतील.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Chai-Pakodey make me go... . #AyaMausam . Picture by @abheetgidwani

A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi) on

 

. सुनीर हे बदला आणि केसरी या सिनेमाचे निर्माते होते. विशेष म्हणजे हॉलिवूड सिनेमा द डिपार्टेड हा देखील हाँगकाँगचा सिनेमा ‘इंटर्नल अफेअर्स’चा रिमेक आहे. द डिपार्टेड हा सिनेमा  मार्टिन स्कोर्सेसे यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात लियोनार्डो डिकैप्रियो, मॅट डेमन, जॅक निकोलसन, मार्क वाह्लबर्ग, मार्टिन शीन आणि एलेक बाल्डविन यांच्या भूमिका होत्या. आता सिद्धांतची या सिनेमातील भूमिका कोणती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share