Exclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत

By  
on  

या स्वातंत्र्यदिनाला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच 18 जुलैला होत आहे. खास या ट्रेलर लाँचला उपस्थित राहण्यासाठी अक्षय कुमार लंडनहून सुट्टी अर्धवट सोडून नुकताच भारतात परत आला आहे. अक्षय त्याचा महत्त्वकांक्षी सिनेमा ‘मिशन मंगल’साठी खुपच उत्साहित आहे. त्यामुळेच या सिनेमाच्या ट्रेलर लाँचसाठी तो लंडनमधील सुट्टी अर्धवट टाकून आला आहे.

अक्षय या सिनेमात एका संशोधकाची भूमिका साकारत आहे. जगन शक्ती दिग्दस्र्हित ‘मिशन मंगल’ या सिनेमाची स्टार कास्टही खुप मोठी आहे. या सिनेमात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि शरमन जोशी, परेश रावल, किर्ती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं पोस्टर लाँच करताना अक्षयने  ‘हा सिनेमा माझी मुलगी आणि तिच्या वयाच्या मुला-मुलींसाठी आहे. कारण त्यांनीही भारताने आतापर्यंत अवकाश संशोधनात किती यश मिळवलं ते समजणं गरजेचं आहे.’ हे विधान केलं होतं.

Recommended

Loading...
Share