By  
on  

Exclusive: कारगिलच्या युद्धभूमीवर शूट होणार सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह' मधील लढाईचा प्रसंग

करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'च्या अंतर्गत लवकरच एक वॉर सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा अन्य कोणता नसून 'शेरशाह' असणार आहे. 'शेरशाह' हा वॉर सिनेमापेक्षा जास्त बायोपिक असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडियन कैप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. विक्रम बत्रा यांची प्रमुख भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा साकारत आहे. पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार या सिनेमातील कारगिल युद्धाचा प्रसंग कारगिल येथेच शूट होणार आहे. 

कारगिल जम्मू आणि काश्मीर येथील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. १९९९ ला भारताचं पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धामुळे हि जागा चर्चेत आली. नंतर याच युद्धावर आधारित 'LOC कारगिल' हा सिनेमा प्रचंड गाजलेला. परंतु या सिनेमाच्या मेकर्सना कारगिल येथील मूळ भूमीवर  'LOC कारगिल' शूट करता आला नाही. 

परंतु आता करण जोहरचा सिनेमा  'शेरशाह' मध्ये आता तुम्हाला कारगिलचे मूळ स्थान प्रेक्षकांना चित्रीत करुन दाखविण्यात येईल.  पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार सिनेमाचे निर्माते कारगिल युध्दाच्या मूळ स्थानी सिनेमाचा मुख्य भाग चित्रीत करणार आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार या युध्दभूमीवर जवळपास 20 दिवस सिनेमाचं शूटींग चालणार आहे. ही पहिलीच वेळ जेव्हा कारगिलच्या युध्दभूमीवर इतके दिवस सूटींग चालणार आहे. सिध्दार्थ या शूटींगसाठी कारगिलला रवानासुध्दा झाला आहे. 

विष्णुवर्धन दिग्दर्शित 'शेरशाह' सिनेमात सिध्दार्थसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पुढीव वर्षी म्हणजे 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive