By  
on  

Exclusive: टीव्ही गर्ल सुहानी धानकी मोदी आहे करणची ‘तख्त’साठी नवी चॉईस

करण जोहरच्या सिनेमांची चर्चा सिनेमाच्या घोषणेपासूनच असते. या सिनेमात काय कास्ट असेल याची उत्सुकता त्याच्या फॅन्सनाही असते. करणने मल्टीस्टारर तख्तमध्ये आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ‘पोरस’ या टिव्ही मालिकेतील अभिनेत्री सुहानी धानकी मोदी हिला करणने तख्तसाठी साईन केलं आहे.

या सिनेमात रणवीर सिंह, करीना कपूर खान, आलिया भट्ट, विक्की कौशल, जान्हवी कपूर, भूमि पेडणेकर आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सुहानीने पोरसमध्ये लाछी ची व्यक्तिरेखा साकारली होती. सिनेमात ती जान्हवीच्या खास भूमिकेत दिसेल.

खरं तर लंडनला शिफ्ट झाल्याने ती या भूमिकेसाठी फारशी उत्सुक नव्हती. पण करणने तिच्यासोबत वैयक्तिक चर्चा करून तिला या सिनेमाचा भाग होण्यासाठी तयार केल्याचं समोर आलं. हा सिनेमा पुढील वर्षातील फेब्रुवारीमध्ये रिलीज होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive