Exclusive: 'तख्त'ची इटलीत होणारी 60% शूटींग आता भारतात, करण जोहर घेतोय लोकेशन्सचा शोध

By  
on  

करण जोहर हा बॉलिवूडचा यशस्वी आणि आघडीचा निर्माता दिग्दर्शक. जगभर करोना व्हायरसने हाहाकार माजवलाय आणि त्याचा धसका करणनेसुध्दा घेतलाय. आज प्रत्येकजण घरातच कैद झालाय. मनोरंजन विश्वाला याचा खुप फटका बसलाय. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला करण जोहर व रोहित शेट्टीची  सहनिर्मिती असलेला सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाहीय. तर याच पार्श्वभूमीवर त्याला आणखी एक फटका बसतोय ते म्हणजे त्याच्या आगामी मल्टिस्टारर व बहुप्रतिक्षित 'तख्त' सिनेमाचं शूटींग याच करोना व्हायरसमुळे आता आणखी लांबणीवर पडतंय. त्यामुळे त्याच्या दोन सिनेमांचं भविष्य सध्या अधांतरीच आहे. 

'तख्त' हा मुघल साम्राज्यावर बेतलेला बिग बजेट सिनेमा असून करण जोहरच्या खुप जवळचा आहे. त्याचं दिग्दर्शनही तोच करतोय. पण या सिनेमाचं जवळपास ६० टक्के शूटींग हे इटलीत होणार होतं, अशी पिपींगमून डॉट कॉमला एक्सक्ल्युझि्व्ह माहिती मिळली आहे,याच लोकेशनवर  ४५ दिवसांचं योग्य ते सर्व नियोजन करणने खुप पूर्वीपासून केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार इटलीतील हे लोकेशेन तख्तसाठी अगदी परिपूर्ण होतं. तिथला एकच सेट हा आपल्याकडील २० सेट्सच्या बरोबरीचा होता. करण या लोकेशनवर शूट करण्यास खुपच उत्सुक होता व ख्रिसमस २०२० च्या मुहूर्तावर हा सिनेमा रसिकांच्या भेटीस आणण्याचं उध्दिष्ट करणच्या धर्मा प्रोडक्शनने ठेवलं होतं. पण जगभर करोनाने दहशत पसरवली आणि आता करणच्या तख्तसाठी त्याला दुस-या लोकेशनच्या विचार करावा लागतोय.  कर

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी इटली हा देश आहे, त्यामुळे आता तिथे शूटींग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता करण सिनेमासाठी सूट होणा-या भारतातल्या २० नव्या लोकेशन्सचा शोध घेतोय. बहुतेककरुन जोधपूर व जैसलमेरचीच तो निवड करेल असं म्हटलं जात आहे. 

करिना कपूर खान, रणवीर सिंह, विकी कौशल, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट ऐतिहासिक 'तख्त'मध्ये पाहायला मिळणार आहे. सिनेमात विकी कौशल औंगजेब साकारतोय तर रणवीर सिंह हा औरंगजेबचा मोठा भाऊ दारा म्हणून पाहायला मिळेल. तर अभिनेता अनिल कपूर सिनेमात त्यांचे वडील मुघल सम्राट शहाजान साकारतील 

Recommended

Loading...
Share