Exclusive: ‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूरला झाला करोना, सविस्तर वाचा

By  
on  

सध्या संपूर्ण जग करोनाने धास्तावलं आहे. याचा फटका सर्वत्रच बसला आहे. मनोरंजन विश्वही घरात बंदिस्त झालं आहे, पण नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार करोनाची लागण झालेली पहिली बॉलिवूडमधून करोनाग्रस्त ठरली आहे, गायिका कनिका कपूर. ‘बेबी डॉल’ या गाण्यामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. लंडनहून लखनऊला परतली आणि वैद्यकीय तपासणीत तिला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, कनिकाला लखनौच्या किंग जॉर्ज रुग्णालयात १४ दिवसांसाठी आयसोलेशन विभागात ठेवणार आहेत. कनिकानेच काही निवडक  माध्यमांसाठी एक स्टेटमेंट जारी केलं आहे. 

यात कनिकाने  म्हटलं आहे,” मला चार दिवसांपासून तापाची लक्षणं होती, आता मला Covid-19झाल्याचं निदान झालं आहे. मी आणि माझे कुटुंबिय संपूर्णपणे क्वारंन्टाईन आहोत. आम्ही कोणाच्याच संपर्कात येत नाही. सतत वैद्यकीय निगराणी खाली आहोत.” तसंच ती पुढे स्पष्ट करते, “माझी प्रकृती सध्या ठीक असून नॉर्मल ताप आहे.”  सर्वांनीच काळजी घ्या, खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं आवाहनही तिने केलं आहे. 

कनिका लंडनहून परतल्यानंतर लखनौला आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. तसंच आल्यावर तिने एक डिनर पार्टीसुध्दा आयोजित केली होती आणि या पार्टीसाठी तब्बल 100 पाहुणे हजर असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे आता लंडनहून परतल्यानंतर करोनाचं निदान होईपर्यंत कनिका कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात आली होती, याचा आता वैद्यकीय अधिकारी तपास घेत आहेत. त्यामुळे आता प्रकरण थोडं गंभीर असल्याचंही दिसतंय. 

Recommended

Loading...
Share