By  
on  

Exclusive: मेहनती अक्षयकुमार, सिंगापूरहून आलेल्या दिवशी करणार ‘गुड न्युज’चं शुटिंग सुरु

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या कमिटमेंट्बद्दल किती सिरीयस असतो ते प्रत्येकालाच माहिती आहे. एक्सरसाईज असो किंवा शुटिंग अक्षय त्याच्या वेळेबद्द्ल जागरुक असतो. अक्षयच्या प्रोफेशनालिझमचा दाखला देणारं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. अ‍क्षय नुकताच आई अरुणा भाटिया यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सिंगापूरला गेला आहे. तो २३ जानेवारीला भारतात परत येईल आणि थोडाही वेळ न दवडता ‘गुड न्युज’ सिनेमाच्या सेटला जॉईन करेल. या सिनेमात तो करीना कपूर खानसोबत दिसेल.

अक्षयसाठी हे वर्षसाठी खुपच व्यस्त असणार आहे. तो आर. बाल्कीच्या ‘मिशन मंगळ’मध्ये विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, नित्या मेमन यासोबत दिसेल. हे शुटिंग संपवून तो कियारा अडवाणी, करीना कपूर आणि दिलजीत दोसांज यांच्यासोबत गुड न्युजच शुटिंग सुरु करेल. अक्षयचं शेड्युल सध्या खुपच बिझी असलं तरी तो रविवारी कधीच काम करत नाही. हा वेळ नेहमीच घरातल्यांसाठी देतो. पण तो सिंगापूर्हून बुधवारी येत आहे याशिवाय मिशन मंगळचं शुटिंग संपल्याने त्याला गुड न्युजसाठी पुरेसा वेळ मिळेल.

गुड न्युज हा एक रोमॅंटिक कॉमेडी प्रकारचा सिनेमा आहे. घरी बाळ येणार हे समजल्यावर एका जोडप्याच्या आयुष्यात होणारे बदल आणि प्रसंगांचं चित्रण विनोदी पद्धतीने करण्यात आलं आहे. या सिनेमाचं शुटिंग पंजाबमध्ये केलं जाईल. सिनेमाच्या सेकंड आणि थर्ड शेड्युलमध्ये अक्षय आणि करीना एकत्र असतील. चाहतेही ब-याच दिवसांनी या लाडक्या जोडीला पाहायला उत्सुक असत्तील यात शंका नाही.

https://twitter.com/Advani_Kiara/status/1087319856926609409

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive