आज संपूर्ण जगावर करोनाचं भीषण संकंट कोसळलं आहे. या संकटापासून देशाला वाचविण्यासाठी सरकार युध्द पाचळीवर काम करतंय. आता जळपास २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यता आला आहे. संचारबंदीही लागू आहे. पण याच दरम्यान काही अफवांनासुध्दा पेव फुटलं आहे.
क्वारंटाईन काळात कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कुठल्या गोष्टींवर नाही प्रत्येकाने ठरवायचं असतं. पण इंटरनेटवरील सर्वच गोष्टींवर विश्वस ठेवायचा नसतो. ते पण खास करुन बॉलिवूडच्या बातम्यांबाबत. असंच झालं. करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन त्यांच्या भव्य दिव्य व बिग बजेट मल्टिस्टारर 'तख्त' या आगामी सिनेमाची फॉक्स स्टार इंडीयासोबत सहयोगाने निर्मिती करतंय, असं वृत्त आज सकाळी एका मनोरंजन वेबसाईटने दिलं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये ट्रेड सर्कलमध्ये यामुळे एकच खळबळ माजली. परंतु पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार या बातमीत कुठलंच तथ्य नाही. तर ही बातमी धांदात खोटी आहे. फॉक्स स्टार इंडीया ही प्रसिध्द सिनेनिर्मिती संस्था असून ती सिनेमांचं वितरणही करते.
पिपींगमूनला जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने 'तख्त'साठी फॉक्स स्टार इंडीयाला कधीच अप्रोच केलं नाही. तख्त हे ऐतिहासिक प्रोजेक्ट संपूर्णपणे करण एकटा सांभाळतोय. त्याचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे.
करिना कपूर खान, रणवीर सिंह, विकी कौशल, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट ऐतिहासिक 'तख्त'मध्ये पाहायला मिळणार आहे. सिनेमात विकी कौशल औंगजेब साकारतोय तर रणवीर सिंह हा औरंगजेबचा मोठा भाऊ दारा म्हणून पाहायला मिळेल. तर अभिनेता अनिल कपूर सिनेमात त्यांचे वडील मुघल सम्राट शहाजान साकारतील. २०२१ मध्ये 'तख्त' रसिकांच्या भेटीला येणार आहे.