Exclusive : रवीना टंडन नेटफ्लिक्सच्या थ्रीलर सीरजमधून वेबविश्वात करतेय पदार्पण?

By  
on  

तू चीज बडी है मस्त मस्त...गर्ल रवीना टंडन लवकरच पुन्हा एकदा रसिकांवर आपली जादू करणार आहे. मनिषा कोईरालानंतर आता लवकरच रवीन टंडनही वेबविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पिपींगमून मराठीला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार बॉलिवूडची ही अस्सल  मोहरा अभिनेत्रीने वेबसिरीज साईनसुध्दा केली आहे. प्रसिध्द निर्माते सिध्दार्थ रॉय कपूर यांची रॉय कपूर फिल्म्स या वेबसिरीजची निर्मिती करत असून नेटफ्लि्क्सवर ती प्रसारित करण्यात येणार आहे. 

रवीना भूमिका साकारत असलेली ही वुमन ओरिएन्टेड थ्रीलर वेबसिरीज आहे. अशाप्रकारची भूमिका रवीनाने यापूर्वी कधीच साकारली नाही. कथाननकाबाबतचा उलगडा अद्याप झाला नसला तरी खुर्चीला खिळवून ठेवणारी ही वेबसिरीज असणार आहे. दिग्दर्शक रोहन सिप्पी या वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या रवीनाची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजचं प्री-प्रोडक्शनचं काम सुरु आहे. करोना व्हायरसचं संकट टळल्यानंतर ही वेबसिरीज फ्लोअरवर जाईल. दरम्यान, रवीनाने केजीएफ चॅप्टर २ या सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं असून या वर्षाअखेरीस किंवा मध्यावर हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईला. 

रवीनाच्या वेबपदार्पणासाठी तिच्यासह चाहतेसुध्दा बरेच उत्सुक आहेत. 
 

Recommended

Loading...
Share