सध्या देशभरात करोनाने कहर सुरुय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय. या काळात सर्वांना सक्तीने घरात बसायचं आहे. सर्व दैनंदिन व्यवहारसुध्दा ठप्प आहेत. सर्व सेलिब्रिटीसुध्दा घरीच आहेत आणि आपला क्वारंटाईन काळ घालवत आहेत. सनी देओलने या क्वारंटाईन कालात मुलाच्या सिनेमाच्या विषयावर विचारमंथन करण्यासाठी सदुपयोग केला आहे,
पिपींगमून डॉट कॉमला मिळालले्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, अभिनेता सनी देओलने एक अॅक्शन थ्रीलर साईन केला आहे. त्यात तो अंध आर्मी ऑफीसरच्या भूमिकेत झळकणार आहे. पण यासोबतच तो आणखी एका प्रोजेक्टवर काम करतोय. सनी करण देओलच्या सिनेमासाठी विषय शोधतोय. गेल्यावर्षी करणने पल पल दिल के पास या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. परंतु या सिनेमाला म्हणावं, तसं यश बॉक्स ऑफीसवर मिळालं नाही. म्हणूनच मुलाला आणखी एक संधी देण्यासाठी तो अजून एका सिनेमाची निर्मीती करतोय.
सनी देओलला दाक्षिणात्य सिनेमांची विशेष आवड आहे. सुपरहिट ब्रोशेवोरेवारुरा या तेलगु सिनेमाचे हक्क त्याने गेल्यावर्षीच विकत घेतले होते. आता या सिनेमाचा तो रिमेक करतोय. हिंदी प्रेक्षकांसाठी सनीची विजेता ही निर्मिती संस्था याची निर्मिती करणार आहे.
या तेलगु सिनेमाच्या दिग्दर्शकालाच सनी हिंदी व्हर्जन डिरेक्ट करण्यास पाचारण करतोय. पण अद्याप तो बुक झालेला नाही. परंतु सध्या लेखकांची टीम सिनेमाच्या हिंदी व्हर्जनवर काम करतेय. ते काम पढील दोन महिन्यात पूर्ण झाल्यानंतर हा सिनेमा जुलैनंतर फ्लोअरवर जाणार आहे व इतर कलाकारांची निवड करण्यात येईल.