Exclusive: अभिषेक चौबे दिग्दर्शित वेबसिरीज मांडणार बलात्काराच्या व्हिडीओ क्लिप मागची खरीखुरी कथा

By  
on  

जंगली फिल्म्सने दिग्दर्शक अभिषेक चौबेसह आपल्या पहिल्या –वहिल्या वेबसिरीजची घोषणा केली होती.आता जवळपास दोन वर्ष झाली तरी हे प्रोजेक्ट पुढे सरकण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे या प्रोजेक्टने गाशा तर गुंडाळला नाही, अशी चिन्ह दिसू लागली असतानाच पिपींगमून डॉट कॉमला एक्स्क्ल्युझिव्ह माहिती मिळालीय, की यंदा वर्षाअखेरीस या दस-अस्सी वेबसिरीजच्या शूटींगला सुरुवात येईल. 

या प्रोजेक्टशी निगडीत जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दस-अस्सी ही वेबसिरीज फक्त लांबणीवर पडली होती, त्याचा विषय वास्तववादी घटनेवर अवलंबून असल्याने रिसर्चसाठी जास्त वेळ लागला. लेखक शंतनू श्रीवास्तव आणि अक्षत यांनी लेखनावर बरीच मेहनत घेतलीय. अनेक सत्यता पडताळून बघितल्या. म्हणून वेळ लागतोय. त्यामुळे स्क्रिप्टला फायनल टच दिल्यानंतर वर्षाअखेरीस ही वेबसिरीज फ्लोअरवर जाईल. 

दस-अस्सी या वेबसिरीजचा विषय खुपच वेगळा आहे. बलात्काराचे व्हिडीओ कशाप्रकारे स्मार्टफोनवरुन पसरव.ले जातात, यावरच्या विषयावर ही वेबसिरीज बेतली आहे. यूपी जवळ गॅंग रेपच्या व्हिडीओचं चित्रिकरण करुन ते चढ्या भावात कशाप्रकारे बाजारात विकलं जातं, ३० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत याचा भाव असतो.या वास्तवाभोवती ही वेबसिरीज प्रकाशझोत टाकणार आहे. 

यूपीतल्या ख-याखु-या लोकेशन्सवर या भयाण वास्तववादी वेबसिरीजचं शूटींग होणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share