राम माधवानी हे पहिले भारतीय फिल्ममेकर ठरले ज्यांनी अॅमेझॉन प्राईमसोबत २०१६ रोजी वेबसिरीजसाठी साईन अप केलं . त्याच वर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेला सोनम कपूर स्टारर नीरजा हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं प्रेक्षक व समिक्षकांनी खुप कौतुक केलं . आता पिपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, राम माधवानी अॅमेझॉनसाठी जी पौराणिक वेबसिरीज करणार होते, त्याचं आता जवळपास तीन वर्ष झाली तरी प्रोजेक्ट ऑनबोर्ड न झाल्याने तो प्रोजेक्ट डब्यात गेल्याचं वृत्त आहे.
जगाला वेड लावणारी हॉलिवूडची प्रसिध्द 'गेम ऑफ थ्रोन्स' या वेबसिरीजचं भारतीय व्हर्जन राम माधवानी रसिकांसाठी घेऊन येण्याची तयारी करत होते. 'बोधीधर्मा' हे त्या काल्पनिक व पौराणिक वेबसिरीजचं नाव असून राम माधवानी त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होते. गीतकार-लेखक प्रसून जोशी यांच्यासोबत मिळून ते या प्रोजेक्टवर काम करत होते. खरंतर २०१७ च्या वर्षाअखेर या रोमांचक अशा पौराणिक कथेच्या प्रोडक्शन कामकाजाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. परंतु प्रसून जोशी सीबीएफसीच्या मुख्य पदावर असल्याने त्यांच्या बिझी शेड्यूलमधून ते स्क्रिप्ट पूर्ण करु शकले नाहीत. त्यामुले राम माधवानी यांना ह्या वेबसिरीजच्या कामाला सुरुवातच करण्यात अडथळा येत होता. परिणामी अॅमेझॉन प्राईमच्या मुख्य कार्यकारिणीने हा प्रोजेक्ट संपूर्णपणे बंद करुन टाकण्याचा निर्णय घेतला.
दिग्दर्शक राम माधवानी यांनी एकूणच संपूर्ण वेबसिरीजच्या प्रि-प्रोडक्शन, कास्टिंग व इतर सर्व गोष्टींकरता अॅमेझॉन प्राईमकडून अॅडव्हान्स घेतला होता, ते पैसेसुध्दा त्या कारणांसाठी खर्च झाले. पण आता प्रोजक्टनेच गाशा गुंडाळल्याने त्यांना ते पैसे परत करणं अर्निर्वाय आहे.