By  
on  

Exclusive: 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव'मध्ये अर्जुन रामपाल साकारतोय 'महार रेजिमेंट’चा योध्दा

 बॉलिवूडमधील चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असणारा अर्जुन रामपाल हा लवकरच एका योध्दयाच्या भूमिकेत रसिकांसमोर येतोय. मागच्या वर्षी झी ५ च्या थ्रीलर वेब शो द फायनल कॉलमध्ये अर्जून झळकला होता. त्यानंतर जे.पी दत्ता यांच्या पलटन या युध्दावर आधारित सिनमेात त्याने आर्मी ऑफीसरची भूमिका साकारली होती, त्यानंतर आता पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह माहितीनुसा अर्जून  ऐतहासिक सिनेमात महार योध्दा साकारतोय. 

अर्जुन रामपालची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं नाव आहे 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव'. १८१८ साली घडलेल्या दलित समाजाच्या या युध्दावर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन आशू त्रिखा करतोय. भीमा कोरेगावचं हे युध्द जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावणा-या योध्दा अर्जून साकारतोय.

१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगावमध्ये ब्रिटिश व पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ सैनिक ज्यात सुमारे ५०० महार सैनिक जोडीला युरोपियन अत्याधुनिक तोफा व पेशव्यांचे २८,००० सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता. भीमा कोरेगावच्या या लढाईत ‘महार रेजिमेंट’ने इंग्रजांना विजय मिळवून दिला होता, म्हणून ह्या लढाईचा इतिहास आहे. 


               
पिपींगमूनला एक्सक्लुझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार, अर्जुन रामपाल साकारत असलेली भूमिका ही वीर महार योध्दाची आहे. तसंच या सिनेमासाठी खास मराठी लोकसंगीतही लिहलं जात आहे. तसंच अर्जुनच्या मते, त्याला ह्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता अर्जुनला ह्या योध्याच्या भूमिकेत पाहण्याची चाह्तायंना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive