करोनाचा विळखा बॉलिवूडला कनिका कपूरच्या रुपाने पडला. 9 मार्चला कनिका लंडनहून आली होती. आल्यानंतर तिने ट्रॅव्हल हिस्ट्री लपवत अनेक ठिकाणी संचार केला होता. कनिकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर कनिकाला लखनऊच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं होतं.
त्यानंतर दोन वेळा टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर कनिकाला हॉस्पिटलमधून डिसचार्ज दिला गेला. त्यानंतर सरोजनी नगरच्या शालीमार अपार्टमेंटमध्ये तिला काही दिवस क्वारंटाईन राहण्यासाठी ठेवलं गेलं. पण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार कनिका तिच्या घरी नाहीये. आरोग्य विभागाने 6व्या टेस्टसाठी तिच्या अपार्टमेंटचा दौरा केला तेव्हा ती घरी नव्हती. विशेष म्हणजे तिच्या घरातल्यांनाही याबाबत काही माहिती नव्हती.
कनिकावर गुन्हाही नोंद आहे. तिच्यावर आयपीसी कोड 269 (साथीच्या रोगाचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरणं) आणि 270 (कोणत्याही संसर्गाने पिडित असून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणं) खाली गुन्हा नोंदवला गेला होता.