बॉलिवूड गॉसिपची बातच न्यारी आाहे. पण करोना संकटामुळे सर्वच ठप्प असल्याने पॅपाराजीसुध्दा आपापल्या घरी आहेत, त्यामुळे गॉसिप मिळण्याचा प्रश्नच नाही. याहे कोदरम्यान आणखी एक प्रश्न डोकं वर काढतोय, तसा तो गंभीर म्हटला तरी हरकत नाही...अहो, पण एवढे सिरीयस होऊ नका आम्ही बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्याबदद्ल सांगतोय. या लॉकडाऊन दरम्यान हे नेमके आहेत, कुठे...हाच प्रश्न आहे, व हे कोडं सिंघम, सिंम्बा आणि सू्र्यवंशी पण सोडवू शकत नाही इतकं अवघड आहे..
काळोखाला विकी घाबरतो असं म्हटलं जातं. पण बुधवारी तो आपल्या गर्लफ्रेंडच्या घराजवळ दिसला आणि त्याला पोलिसांनी पकडलं अशा अफवा होत्या.पण विकीने या अफवा असल्याचं सांगत ट्विट केलं व मी घरीच आहे असं निक्षून सांगितलं . पण त्याच्या व कतरिनाच्या हालचालींवर आम्हीसुध्दा बारीक लक्ष ठेवून आहोत. कारण यांच काय चाललंय, तेच समजत नाही. या दोघांनी २०२० चं नववर्षाची स्वागत पार्टी अलिबागमध्ये एकत्र साजरी केली होती. त्यामुळे थोडा संशय बळावला आहे.
दरम्यान, विकीने घरात केर काढतानाचा एक फोटो सोशल मिडीयावर शेयर केला होता. त्यावर जुन्या गाण्याच्या हद्यस्पर्शी ओळी त्याने लिहल्या होत्या. पण याच दरम्यान आमची करडी नजर गेली ते झाडू व फरशीवर. ..कारण काही दिवसांपूर्वी कतरिनाने शेअर केलेला केर काढतानाच्या व्हिडीओतील ही झाडू व फरशी मिळती-जुळती आहे. त्यामुळे तुम्हीच एकदा निरखून पाहा आणि काय ते ठरवा.