By  
on  

PeepingMoon Exclusive: Lockdown नंतर अक्षय, सलमान, जॉन अजयसह हे कलाकार परत आणणार बॉलिवूडचं हास्य

आज भीषण  करोना संकट ओढवल्याने  सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. पण कुठेतरी प्रत्येकालाच भविष्याची चिंता लागून राहिली आहे. सिनेमा थिएटर्स इतक्यात तरी उघडण्याची कुठलीच चिन्हं नाहीत, ते उघडायला बराच काळ जाईल. म्हणूनच आता सर्वजण ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेताना पाहायला मिळतायत. अनेक सेलिब्रिटी आणि सुपरस्टार हे आपल्या सिनेमंसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा निवड करण्याच्या विचारात आहेत. 

अनेक सुपरस्टार आणि इतर कलावंताचे सिनेमे तयार आहेत किंवा जवळपास पू्र्ण झाले असून फक्त फायनल टच बाकी आहेत, असे सिनेमे अगदी प्रदर्शनाच्या उंबठ्यावर आहेत. एक नजर टाकूयात या सिनेमांवर.

अक्षय कुमार (सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बच्चन पांडे, अतरंगी रे, बेल बॉटम) 

प्रत्येक दोन-तीन महिन्यांतून एकदा अक्षयचा सिनेमा हा हमखास प्रेक्षकांच्या भेटीला येतो.  एकापाठोपाठ एक सिनेमे देणा-यांमध्ये अक्षयचा पहिला क्रमांक आहे. पण म्हणून त्याला कसलीच चिंता सध्या तरी नाहीए. अक्षयच्या लक्ष्मी बॉम्बचे मेकर्स या सिनेमच्या डिजीटल रिलीजच्या विचारात आहेत. पण लॉकडाऊन नंतर सिनेमागृह सुरु झाल्यावर अक्षयचा सू्र्यवंशी भेटीला येईल. तर 'पृथ्वीराज' पुढच्या वर्षीच भेटीला येईल. यासोबतच 'बच्चन पांडे', 'अतरंगी रे', 'बेल बॉटम' हे सिनेमे पूर्वीपासूनच २०२१ साठीच पाईपलाईनमध्ये होते. 

सलमान खान ( राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई, कभी ईद कभी दिवाली, किक 2)

सलमान खान चा सिनेमा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' चे  फक्त काही पॅचवर्क आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी होतं. तसंच भाईजानचा राधे या ईदच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला येणार होता, परंतु करोनामुळे ती संधी हुकली आता ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज केला तर जास्त फायदा होईल असं दिसतं. तर 'कभी ईद कभी दीवाली' हा सिनेमा तसंही २०२१ रिलीज दृष्टीनेच भाईजान तया करत होता. कसंच किक-२ बद्दल तर त्यानं यापू्वी कुठलीच अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यामुळे तोसुध्दा २०२१ च्या पाईपलाईनला असेल. 

अजय देवगन (भुज: द प्राइड ऑफ इंडिया, मैदान, RRR, चाणक्य, सिंघम 3, गोलमाल 5)

अक्षय कुमारसारखाच अजय देवगणसुद्दा एकापाठोपाठ एक सिनेमे देण्यासाठी प्रसिध्द आहे. त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच तान्हाजी – द अनसंग वॉरिअर हा ब्लॉकब्स्टर सिनेमा दिला आहे. तर मैदान हा सिनेमा ११ डिसेंबरला रिलीज होणार होता, तो जर त्याने पुढच्या वर्षा केला त काहीच हरकत नाही. भुज: द प्राइड ऑफ इंडिया' च्या तयारीत तो सध्या होता. तर आगामी 'चाणक्य' वर्षाअखेरेस फ्लोअ वर जाण्यास सज्ज आहे. 

जॉन अब्राहम (मुंबई सागा, अटॅक, सत्यमेव जयते 2)

जर लॉकडाऊन नसता तर  जॉन अब्राहमचा सिनेमा 'मुंबई सागा' जूनमध्ये 'अटॅक' ऑगस्टमध्ये तर 'सत्यमेव जयते 2' ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होते. व्यवस्थित प्लॅनिंग करुन त्याने हा निर्णय घेतला होता. परंतु आता करोनाने सर्वत्रच कहर केला आहे. पण आता हे सर्व प्रोजेक्ट पुढेच ढकलले जाणार यात शंका नाही, त्यात अजून पुढच्या वर्षीसाठी जॉनने पूर्वीच काही स्क्रिप्ट्स लॉक केल्या आहेत. 

 

कार्तिक आर्यन (भूल भुलैया 2, दोस्ताना 2, ओम राऊतचा आगामी सिनेमा, शशांक खेतानचा सिनेमा आणि , अला वैकुंठपुरमलचा रिमेक)

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनकडेसुद्दा बरेच सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. २०२०  आणि २०१२१ हे वर्ष त्याच्यासाठी बरंच पॅक आहे.  'भूल भुलैया 2' सोबतच 'दोस्ताना 2’चं बरंचस शूटींग त्याने पूर्ण केलं आहे. त्याला आता एका हिटची आवश्यकता आहे. करोनामुळे सर्वच लांबणीवर पडलं आहे. आता या दोघांपैकी कुठला सिनेमा आदी रिलीज होईल हे पहावं लागेल. तसंच शशांक खेतान व ओम राऊतच्या प्रोजेक्टसवरही तो काम करतोय. बहुतेक ते २०२१ लाच शक्य होईल. तर  'अला वैकुंठपुरमलोट' रिमेकलाही त्याने करण्यासाठी होकार कळवला आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive