करोना व्हायरसमुळे लॉकडाऊनचा जोर सगळीकडे आहे. अशा वेळी बॉलिवूडकरही लॉकडाऊन झाले आहेत. पण हे लॉकडाऊन आहे प्रिय व्यक्तीसोबतच. पीपिंगमूनला या लॉकडाऊन दरम्यान बनत असलेल्या नवीन जोड्यांसंबधी बातमी मिळाली आहे. रणबीर आणि आलिया या जोडीने लॉकडाऊन आधीपासूनच एकमेकांसोबत राहणं सुरु केलं होतं. तर वरुण धवनही आपली भावी पत्नी नताशासोबत शिफ्ट झाला आहे. टायगर आणि दिशा पाटनीदेखील एकमेकांसोबत आहेत.
पण दिशा टायगरची बहीण कृष्णासोबतही तितकाच वेळ घालवताना दिसत आहे. तर एकीकडे अर्जुन कपूर आणि मलायका अरोराही सरकारी नियमांचं पालन करत भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले आहेत. करोनामुळे रिअर रोमांस ऐवजी व्हर्च्युअल रोमान्सलाही प्राधान्य दिलं जात आहे. अनन्या पांडे आणि इशान खट्टर ही जोडी व्हर्च्युअल रोमान्समध्ये मग्न आहे.
याशिवाय कतरिना आणि विकी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी या जोड्याही व्हर्च्युअल रोमान्समध्ये मग्न आहेत. यासोबतच सरप्राईजिंग जोडी आहे ती कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर ची सिक्रेट रिलेशनशीप जी आता सिक्रेट राहिली नाही. कार्तिकचं नाव जवळपास त्याच्या प्रत्येक को-स्टारशी जोडलं गेलं आहे.