जान्हवी कपूर आपल्या आगामी 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या सिनेमासाठी बरीच उत्सुक होती. हा सिनेमा २० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता करोनामुळे सर्वच पार विस्कटून गेलं आहे. अजूनतरी सिनेमागृह उघडण्याची चिन्हं नाहीत. पण माहित नाही, हे वृत्त आता खरं आहे की नाही. पिपींगमून डॉट कॉमला एक्सक्ल्युझिव्हरित्या मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीचा हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन रसिकांच्या भेटीला येण्याची दाट शक्यता आहे.
भारताच्या लढाऊ विमानाची माजी फायटर पायलट गुंजन सक्सेनाची व्यक्तिरेखा जान्हवी सिनेमात साकारते आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने आणि झी स्टुडिओजने याची निर्मिती केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या या कठीण समयी सर्वच सिनेमे हे ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला अपवाद फक्त दोनच मोठे सिनेमेच ठरतील. सुपरस्टार अक्षय कुमाचा 'सूर्यवंशी' आणि बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवी सिंहचा '83 द फिल्म' हा सिनेमा थिएटर रिलीजच्या प्रतिक्षेत आहे. जान्हवीच्या या सिनेमासह इतर सिनेमे हे वेब रिलीजच्या विचारात आहेत..
'गुंजन सक्सेना' जर वेबवर प्रदर्शित झाला तर ही जान्हवीसाठी काहीशी निराशाजनक बातमी ठरेल. कारण 'धडक' या बॉक्स ऑफीस हिटनंतर तिचा हा दुसराच सिनेमा आहे. जो प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत होता. धडकला प्रदर्शित होऊन आता जवळपास दोन वर्ष होत आली आहेत. त्यामुळे थिएटरद्वारे पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्याची जान्हवीसाठी एक उत्तम संधी होती. त्यातून जीवनपट साकारणं हे आणखी एक जमेची बाजू . पण जे काही आहे, ते लवकरच सर्वांना समजेल अशी आशा करुयात.
मागच्या वर्षी 'गुंजन सक्सेना'चं शूटींग लखनौमध्ये सुरु झालं होतं. शरण शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पंकज त्रिपाठी यांनी गुंजनच्या वडिलांची तर अंगद बेदीने गुंजनच्या भावाची व्यक्तिरेखा सिनेमात साकारली आहे.