By  
on  

Exclusive: इरफानचं पार्थिव घरी नेण्यास कुटुंबियांना पोलिसांनी परवानगी नाकारली

इरफान खानचं आज बुधवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप पाडणाा इरफान खानसारखा हरहुन्नरी अभिनेता हरपल्याने सर्वच स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याच्या आत्म्याला शांती मिळो, अशी जरी आपण प्रार्थना करत असलो तरी त्याच्या कुटुंबियांच्या अडचणी आता वाढल्या  आहेत. 

करोनामुळे देशभर लॉकडाऊन काळ सुरु  आहे. त्यामुळे त्याचं पार्थिव घरी नेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे स्मशानभूमीत जाऊन त्वरित अंत्यसंस्कार करुन घ्यावेत. पण कुटुंबियांना त्याचं पार्थिव घरी नेऊन इतर अंत्यसंस्कार करायचे आहेत. रमझानच्या पवित्र महिन्यात इरफानने अखेरचा श्वास घेतला. आशा करुयात हा तिढा लवकर मिटो व इरफानच्या आत्म्यास शांती लाभो. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive