By  
on  

Exclusive: तब्ब्येत सुधारावी यासाठी इरफान हरेक प्रयत्न करून पाहायचा: मृणाल कुलकर्णी

प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याचं नुकतंच निधन झालं. इरफानने वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इरफानसोबत मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने ‘श्रीकांत’ या मालिकेत काम केलं होतं. त्यावेळेची आठवण मृणालने पीपिंगमूनसोबत शेअर केली आहे. मृणाल म्हणते, श्रीकांत मालिकेदरम्यान मी इरफानसोबत काम केलं होतं. आमच्या दोघांचीही ती पहिली मालिका होती. त्या कर्करोगाचं निदान झाल्यावर तर आम्ही एकमेकांच्या संपर्कात जास्त काळ होतो.

 

मी या संदर्भातील काही संस्थांशी जोडली आहे. त्यामुळे इरफानला त्याद्वारे काही उपयोग होईल का यासाठी प्रयत्नशील होते. तोही बरं होण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करायचा. मी अगदी गेल्या आठवड्यापर्यंत त्याच्या संपर्कात होते. पण आयसीयुमध्ये गेल्यानंतर त्याने फोन बंद ठेवला होता. कलाकार म्हणून तो जितका अप्रतिम होता, माणूस म्हणून तो तितकाच साधा होता. अगदी शंका यावी इतका साधा होता तो. खुप प्रेमळ, साधा, सरळ माणूस आणि माझ्यासाठी सच्चा मित्र होता.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive